गणेशोत्सव, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन
By Admin | Updated: September 8, 2016 00:39 IST2016-09-08T00:39:00+5:302016-09-08T00:39:13+5:30
गणेशोत्सव, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन

गणेशोत्सव, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन
कळवण : गणेशोत्सव व बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कळवण पोलीस स्टेशनच्या वतीने कळवण शहरातून संचलन करण्यात आले. सार्वजनिक उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या रुट मार्च चे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस स्टेशनपासून निघालेला हा रुट मार्च मेनरोड, गणेशनगर, बसस्थानक, फुलाबाई चौक, शाहीर लेन, गांधी चौक, मेनरोड यामार्गे निघून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आला. सण-उत्सवांच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, शांतता अबाधित राहावी, सर्वधर्मियांनी एकोप्याने सण साजरे करावेत त्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.
या रु ट मार्चमध्ये कळवणचे पोलीस निरीक्षक सुजय घाटगे, उपनिरीक्षक विनोद जाधोर, गडाख, हवालदार बबन पाटोळे, वाहतूक पोलीस आर.जी. जाधव आदींसह महिला व पुरु ष पोलीस कर्मचारी, होमगार्ड, समादेशक अधिकारी पवार व सर्व महिला आणि पुरु ष होमगार्ड सहभागी झाले होते.
कळवण शहरात १३ रस्ते असून गणेशनगर, शिवाजीनगर, मेनरोड, पेट्रोलपंप, स्टेट बँक, एसटी बसस्थानक, महाराजा चौक , कळवण पोलीस स्टेशन परिसर, फाशी चौक, सुभाष पेठ आदिंसह शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केले असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कळवण शहरात येणारा, जाणारा आणि प्रत्येक गणेशभक्त कैद होणार आहे.दिवस-रात्र हे कॅमेरे सुरु राहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. (वार्ताहर)