गटारकामाच्या चौकशीसाठी आंदोलन
By Admin | Updated: April 3, 2017 22:46 IST2017-04-03T22:46:12+5:302017-04-03T22:46:37+5:30
मालेगाव : गटारीवरील स्लॅबकामाची चौकशी करावी, यासाठी भ्रष्टाचारमुक्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.

गटारकामाच्या चौकशीसाठी आंदोलन
मालेगाव : शहरातील शिव रोडवरील सर्व्हे क्रमांक ५७ येथे गटारीवरील स्लॅबकामाची चौकशी करावी, या मागणीसाठी भ्रष्टाचारमुक्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. शहरातील सर्व्हे क्रमांक ५७ येथे गेल्या महिनाभरापूर्वी एक लाख ५६ हजार रुपये खर्च करून गटारीवर स्लॅब उभारण्यात आला होता. मात्र या कामाला महिनाही उलटत नाही तोच स्लॅब कोसळून पडला आहे. यामुळे मनपाचा खर्च वाया गेला आहे. या निकृष्ट कामाची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रिजवान बॅटरीवाला यांच्यासह पदाधिकऱ्यांनी केली आहे.