जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By Admin | Updated: March 3, 2017 00:33 IST2017-03-03T00:33:13+5:302017-03-03T00:33:37+5:30
पिंपळगाव बसवंत : आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी संघटनेच्या राज्यव्यापी आंदोलनात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले

जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन
पिंपळगाव बसवंत : आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी संघटनेच्या राज्यव्यापी आंदोलनात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले.
जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाने अर्थसाहाय्य करणे गरजेचे आहे व या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तिवेतन भत्ते आदि व शासनाने स्वीकारावे यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासन लक्ष देण्यास टाळाटाळ करीत आहे.
यासाठी सर्व संघटित कर्मचारी संपावर गेले असून, याकामी शासनाला दि. ४ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. जर या मुदतीत मागण्या मान्य न केल्यास बेमुदत संपावर जाणार असल्याने याचा परिणाम प्रत्यक्ष नागरिकांवर परिणाम होणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष एम.के. पवार यांनी दिली. विभागातील सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून काम करत आहेत.