देवळा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे आंदोलन

By Admin | Updated: June 27, 2014 00:17 IST2014-06-26T21:30:23+5:302014-06-27T00:17:21+5:30

देवळा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे आंदोलन

Movement of Deola Taluka Gram Panchayat Employees Association | देवळा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे आंदोलन

देवळा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे आंदोलन

 देवळा : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनस्तरावरून लागू असलेल्या विविध सेवा सवलतींचा लाभ मिळण्यासाठी अंमलबजावणी व्हावी. यासाठी आयटक संलग्न देवळा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने मंगळवार, दि. १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष सुधाकर अहेर यांनी दिली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नवीन सुधारित किमान वेतन व राहणीमान (विशेष) भत्ता लागू केलेला आहे. त्याचा लाभ अद्यापपावेतो तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष होता. शासन स्तरावरून लागू असलेले सुधारित किमान वेतन परिमंडळनिहाय कर्मचाऱ्यांना १०० टक्के पूर्तता व्हावी, सुधारित राहणीमान भत्ता थकीत फरकासह मिळावा. याबाबत प्रशासनास थकबाकी पूर्ततेकरिता आदेश व्हावेत, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्र्वाह ८.३३ टक्के प्रमाणे कपात करून पंचायत हिश्श्यासह रक्कम कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्र्वाह खाते उघडून त्यात जमा करावी. ग्रॅज्युएटी पेमेंट आॅफ अ‍ॅक्ट १९७२ या कायद्यान्वये रक्कम अदा व्हावी. ओळखपत्र देण्यात यावे. सेवापुस्तक अद्यावत व्हावे. जिल्हा परिषदेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणे किरकोळ, मेडिकल रजा व इतर रजा मिळाव्या. जिल्हा सेवा वर्ग ३ व ४च्या १० टक्के आरक्षण भरतीकरिता दरवर्षी मंजूर करण्यात येणाऱ्या सेवा ज्येष्ठता सूचिकरिता दहा वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती जिल्हा परिषदेला ग्रामपंचायत स्तरावरून परस्पर उपलब्ध करून देणे बंधनकारक करावे, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला शिल्लक अर्जित रजेचा लाभ मिळावा, पंचायत समिती स्तरावर दर तीन महिन्याला नियमित तक्रार निवारण बैठकांचे आयोजन व्हावे. या मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

Web Title: Movement of Deola Taluka Gram Panchayat Employees Association