ऊसतोड कामगारांचे मागण्यांसाठी आंदोलन
By Admin | Updated: October 24, 2015 22:35 IST2015-10-24T22:34:37+5:302015-10-24T22:35:21+5:30
ऊसतोड कामगारांचे मागण्यांसाठी आंदोलन

ऊसतोड कामगारांचे मागण्यांसाठी आंदोलन
न्यायडोंगरी : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणार असल्याने राज्याच्या विविध भागांतील साखर कारखान्याचे अधिकारी ऊसतोड कामगारांना घेण्यासाठी न्यायडोंगरी व चाळीसगाव भागात दाखल झाले होते. मात्र महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी कामगारांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवून कामगारांना नेण्यास अटकाव केला. व वाहनांच्या चाकातील हवा काढून घेत कामगारांना खाली उतरून घेतल्याने कारखानदारांचे चांगलेच धाबे दणाणलेआहे.
कामगार युनियनच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन सुरू असून, कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत एकही ऊसतोड कामगार ऊस तोडणीसाठी जाणार नाही, असा पवित्रा संघटनेने घेतल्याने विविध भागातील संघटनेचे कार्यकर्ते आपापल्या भागात आंदोलन करून कामगार वाहतूक करणारे वाहने अडवीत आहेत. त्याचा एक भाग म्हणून नांदगाव तालुका ऊसतोड कामगार युनियनचे अध्यक्ष भरत शेलार व न्यायडोंगरीचे अध्यक्ष चांगदेव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली न्यायडोंगरी येथील राज्यमार्ग क्रमांक २४ वर असलेल्या सावरगाव चौफुलीवर आज अचानक आंदोलन करण्यात आले. त्यात कामगार वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवून चाकातील हवा काढून सर्व कामगारांना खाली उतरून घेण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे बाळासाहेब महानोर, दत्तू जाधव, दिलीप राठोड, मधू वना, गोरख जाधव, रामदेवजी पवार, अनिल राठोड, राजेंद्र चव्हाण इत्यादिंसह अनेक कार्यकर्ते सामील झाले होते. अशी माहिती अध्यक्ष भरत शेलार व चांगदेव चव्हाण यांनी दिली व जोपर्यंत युनियनच्या मागण्या मान्य करण्यात येत नाही, तोेपर्यंत एकही ऊसतोड कामगार साखर कारखान्यापर्यंत जाणार नाही, अशी ग्वाही देत त्यासाठी आमचे कार्यकर्ते रात्रंदिवस रस्त्यावर
गस्त घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
’ नाशिक : पंचवटीतील तेलंगवाडीत राहणाऱ्या एका महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना गुरुवारी (दि़२२) दुपारच्या सुमारास घडली़ मयत महिलेचे नाव विमल गंगाधर जाधव (४९) असे आहे़
आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)