शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

संगणक परिचालकांचे आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:04 IST

मानोरी : येवला तालुक्यातील युवकांचा सहभागमानोरी : येवला तालुक्यासह राज्यभरात असलेल्या आपले सरकार सेवा प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात असलेल्या राज्यातील संगणक परिचालकांचा विविध मागण्यांसाठी २७ नोव्हेंबरला सुरू असलेला मोर्चा चौथ्या दिवशीही आझाद मैदानात सुरू आहे.

ठळक मुद्देसंगणक परिचालकांना आजपर्यंत ६०,००० रुपये मानधन मिळालेच नसल्याची माहिती

आंदोलनात सहभागी झालेले येवला तालुक्यातील संगणक परिचालक.

 

मानोरी : येवला तालुक्यातील युवकांचा सहभागमानोरी : येवला तालुक्यासह राज्यभरात असलेल्या आपले सरकार सेवा प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात असलेल्या राज्यातील संगणक परिचालकांचा विविध मागण्यांसाठी २७ नोव्हेंबरला सुरू असलेला मोर्चा चौथ्या दिवशीही आझाद मैदानात सुरू आहे.अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांनीही विधान परिषदेत याप्रश्नी आवाज उठविला असता ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सारवासारव करीत संगणक परिचालकांना वर्षाला ६० ते ७० हजार रुपये मिळत असल्याची माहिती मांडली. पंकजा मुंडे यांनी दिलेले उत्तर खोटे असून, संगणक परिचालकांना आजपर्यंत ६०,००० रुपये मानधन मिळालेच नसल्याची माहिती संगणक परिचालक राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच आझाद मैदानात येऊन संगणक परिचालकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन तसेच सर्व शिवसेना आमदार संगणक परिचालकांच्या मागण्या विधानसभेत मांडण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संगणक परिचालक मोर्चात सहभागी होत कंपनी मनमानी कारभार करीत असून, संगणक परिचालक अनेक महिन्यांपासून मानधन मिळाले नसून त्यांच्या मागण्या राज्य शासनाने तत्काळ लागू करण्याची मागणी अजित पवार यांनी यावेळी केली. यावेळी संगणक परिचालक राज्याचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्यात रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. येवला तालुक्यातील ७० हून अधिक तसेच राज्यातील हजारो संगणक परिचालक आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत.संगणक परिचालकांना आयटी महामंडळात समाविष्ट करण्याचा अधिकार ग्रामविकास विभागाला नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा निर्णय असून, आपले सरकार सेवा केंद्रात नवीन प्रकल्प सुरू करणार असून, संगणक परिचालकांनी या सेवातून मोबदला घ्यावा, अशी माहिती अधिवेशनात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.