पोलीस दलातर्फे चांदवडला संचलन

By Admin | Updated: September 2, 2014 01:11 IST2014-09-01T22:30:06+5:302014-09-02T01:11:34+5:30

पोलीस दलातर्फे चांदवडला संचलन

Movement of Chandwad by the police force | पोलीस दलातर्फे चांदवडला संचलन

पोलीस दलातर्फे चांदवडला संचलन



चांदवड : शहरात गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था आबादित राहावी तसेच दोन दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकारामुळे शांतता राहावी यासाठी मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक
नरेश मेघराजानी व चांदवड
पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहायक पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड शहरातून सशस्त्र पोलीस संचलन करण्यात आले.
यावेळी राज्य राखीव दल, गृहरक्षक दल, महिला पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाच्या महिला कर्मचारी यांनी भाग घेतला. चांदवड येथील आठवडे बाजार, बसस्थानक, सोमवारपेठ, शिवाजी चौक, श्रीरामरोड, ग्रामपंचायत कार्यालय या मार्गावरून हे संचलन नेण्यात आले.
गेल्या दोन दिवसांपूर्वीच चांदवड शहरात व्हॉट्सअपवर
गणेश विसर्जनासंदर्भात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्याने शनिवारी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. चांदवड
पोलीस स्टेशनला पोलीस
निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक होऊन शांतता जरी
प्रस्तापित असली तरी या पार्श्वभूमीवर चांदवड येथे गणेशोत्सव काळात गालबोट
लागू नये यासाठी हे संचलन महत्त्वपूर्ण ठरल्याचे पोलिसांनी सांगीतले. (वार्ताहर)

Web Title: Movement of Chandwad by the police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.