सभापतिपदासाठी हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:17 IST2017-07-18T01:17:17+5:302017-07-18T01:17:36+5:30

आजपासून अर्ज वितरण : बिनविरोध निवड होण्याची शक्यता

Movement for the chairmanship | सभापतिपदासाठी हालचाली

सभापतिपदासाठी हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेत नव्याने गठित करण्यात आलेल्या विधी, वैद्यकीय व आरोग्य आणि शहर सुधार या तीन विषय समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदाकरिता निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सभापती-उपसभापतिपदाकरिता मंगळवार (दि.१८) पासून उमेदवारी अर्जांचे वितरण होणार असून, दि. २१ जुलैला अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तीनही समित्यांवर भाजपाचे बहुमत असल्याने बिनविरोध निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मंगळवारी भाजपाचे संघटनमंत्री किशोर काळकर नाशकात येत असून, त्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन नावे निश्चित केली जाणार आहेत.
महापालिकेत नव्याने तीन विषय समित्या गठित करण्यात आल्या आहेत. दि. २६ मे रोजी झालेल्या महासभेत महापौर रंजना भानसी यांनी समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या घोषित केल्या होत्या. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर सभापती-उपसभापतिपदासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला. या तीनही समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदासाठी दि. २४ जुलैला निवडणूक घेण्यात येणार आहे. दि. २४ रोजी सकाळी १०.३० वाजता विधी समिती, दुपारी १२ वाजता शहर सुधार समिती व दुपारी १.३० वाजता वैद्यकीय व आरोग्य समितीच्या सभापती-उपसभापतीची निवड होणार आहे. दि. १८ ते २१ जुलैपर्यत अर्ज विक्री होणार असून, दि. २१ जुलैला दुपारी २ वाजेपर्यंत भाजपाची आज बैठकभाजपाचे प्रदेश संघटनमंत्री किशोर काळकर मंगळवारी (दि.१८) नाशिकला येत असून, त्यांच्या उपस्थितीत दुपारी बैठक होणार आहे. या बैठकीत विषय समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. विषय समित्यांच्या अधिकार व कार्यकक्षेबाबत अद्यापही स्पष्टता नाही. दरम्यान, समित्यांच्या सभापती-उपसभापती यांच्याकरिता राजीव गांधी भवनच्या तिसऱ्या मजल्यावर भुयारी गटार योजना व पर्यटन विभाग याठिकाणच्या जागेत दालने उभारण्यात येणार असून, सभांकरिता महिला व बालकल्याण समितीचेच सभागृह वापरले जाणार आहे.

Web Title: Movement for the chairmanship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.