पाणी भरण्यासाठी सर्रासपणे मोटारपंपचा वापर
By Admin | Updated: October 5, 2015 23:23 IST2015-10-05T23:22:22+5:302015-10-05T23:23:01+5:30
पाणी भरण्यासाठी सर्रासपणे मोटारपंपचा वापर

पाणी भरण्यासाठी सर्रासपणे मोटारपंपचा वापर
पंचवटी : यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने धरणातील शिल्लक जलसाठा लक्षात घेऊन प्रशासनाने पाणीकपातीची घोषणा केली असल्याने शहरात सर्वत्र एकचवेळ पाणीपुरवठा होणार आहे. येत्या गुरुवारपासून एकवेळ पाणीपुरवठा होणार असला तरी सध्या हिरावाडी परिसरातील अयोध्यानगरी भागातील शेकडो नागरिक पाणी भरण्यासाठी मोटारपंपचा वापर करत आहे.
प्रशासानाने यापूर्वीदेखील पाणीकपात केली होती त्यावेळी देखील हिरावाडीतील अयोध्यानगरी भागात असलेले नागरिक नळाला मोटारपंप बसवून पाण्याचा उपसा करत असल्याचे दिसून येत होते.
सदर प्रकाराबाबत मनपा प्रशासनाला माहिती कळविल्यानंतर त्यांच्याकडूनही कोणतीही कारवाई केली नव्हती. आता तर प्रशासनाने पाणीकपातीची घोषणा केली आणि पाण्याचा अपव्यय करणार्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत मात्र हिरावाडी (अयोध्यानगरी) या भागात दैनंदिन पाणी भरण्यासाठी मोटारपंपचा वापर केला जात असला तरी त्याकडे प्रशासन लक्ष देणार का असा सवाल नागरिकांनी केला
आहे. (वार्ताहर)