मोटर सायकल चोरीच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 05:45 PM2019-01-23T17:45:13+5:302019-01-23T17:45:25+5:30

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत हद्दीत गेल्या काही मिहन्यात पासून गाड्या चोरी करणार्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. केवळ पिंपळगाव भागातून गेल्या गेल्या वर्षभरात ३६मोटारसायकल गाड्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत

Motor cycle increase in the number of theft | मोटर सायकल चोरीच्या संख्येत वाढ

मोटर सायकल चोरीच्या संख्येत वाढ

Next

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत हद्दीत गेल्या काही मिहन्यात पासून गाड्या चोरी करणार्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. केवळ पिंपळगाव भागातून गेल्या गेल्या वर्षभरात ३६मोटारसायकल गाड्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत यात ८ गाड्या हस्तगत केल्या असून उर्विरत २८ गाड्याचा अद्यापही शोध लागलेला नाही.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४गावांचा समावेश असून केवळ ३६ कर्मचार्यांवर अवलंबून असलेल्या२४गावांच्या कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असून पिंपळगाव सारख्या बडयाशहरचा वाढता विस्तार बघून संख्या बळ नसल्याने गुन्हेगारीला उत येत आहे.त्यामुळे दिवसाढवळ्या मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढत आहे यात होंडा,शाईन ,व बजाज या गाड्यांना चोरांकडून अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. मागणी तसा पुरवठा या सूत्रानुसार गतिमान पल्सर मोटर सायकल सध्या त्यांच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून मोटारसायकल पार्क करावी असे आवाहन पोलिसांमार्फत केले जात आहे.
या भागांमध्ये गेल्या काही मिहन्यांपासून मोटर सायकल चोरांचा सुळसुळाट झाला असून रस्त्यावर असो वा इमारतीच्या आवारात, महाविद्यालयात असो अथवा शाळेत,किव्हा शासकीय कार्यालय त्यांच्या निशाण्यावर असलेली गाडी ते सहजासहजी उडवत आहेत.

Web Title: Motor cycle increase in the number of theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.