शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

माता न तू वैरिणी : अनैतिक संबंधात अडसर नको म्हणून पोटच्या मुलाचा सख्ख्या आईनेच काढला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 22:34 IST

गुन्ह्याची कबुली देत अनैतिक संबंधामध्ये मुलाचा अडसर निर्माण होऊ लागल्याने त्याचे भींतीवर डोके आपटून ठार मारल्याचे पोलिसांना सांगितले.

ठळक मुद्देमृतदेह जिल्हा रुग्णालयात टाकून केला पोबाराबालकाचा मृत्यू अंगणात खेळताना झाल्याचा केलेला बनाव उघड

नाशिक : आपल्या पहिल्या पतीपासून जन्मलेल्या मुलाचे एक दोन नव्हे तर सात वर्षे सांभाळ करत वाढविलेल्या चिमुकल्याचा सख्ख्या आईनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची ह्रदयद्रावक घटना आडगाव परिसरातील साईनगर भागात घडल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले आहे. आठवडाभरापुर्वी या चिमुकल्याचा अंगणात खेळताना मृत्यू झाल्याचा बनाव करत जखमी अवस्थेत तिच्या आईने बालकाला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते.साईनगर येथे अंगणात खेळताना मोहित घनश्याम जाधव नामक एका सातवर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना २१ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी जिल्हा शासकिय रुग्णालयातून मिळालेल्या माहितीवरुन आडगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मुलाचा मृतदेह अंत्यविधीसाठी ताब्यात न घेता जिल्हा रुग्णालयात दाखल करणारी आई संशयित सुलोचना सोमनाथ कुऱ्हाडे व संशयित आरोपी तिचा पती सोमनाथ ऊर्फ योगेश वसंत कुऱ्हाडे (२२,रा.साईनगर, नांदुरनाका) हेदोघेही फरार झाले होते. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक इरफान शेख यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने याबाबत तपास करत मयत मुलाच्या संशयित माता-पित्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले. यानुसार उपनिरिक्षक धैर्यशिल घाडगे, दिलीप शिंदे, दशरथ पागी, सुनील गांगुर्डे आदींनी तपासाला गती देत घटनास्थळी पाहणी करुन पुरावे गोळा केले. घरात मिळालेल्या काही सुगाव्यांवरुन पथकाने कोपरगाव येथून संशयित महिला सुलोचना हिला बेड्या ठोकल्या. तसेच गुन्ह्यात सहभागी असलेला तीचा पती संशयित सोमनाथ यास पेठरोडवरील एका वसाहतीतून पोलिसांनी अटक केली. या दोघांना पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देत अनैतिक संबंधामध्ये मुलाचा अडसर निर्माण होऊ लागल्याने त्याचे भींतीवर डोके आपटून ठार मारल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी या दोघांविरुध्द खूनाचा गुन्हा व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या दोघांना रविवारी (दि.२) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे शेख यांनी सांगितले.---इन्फो--माणुसकीला काळीमा फासणारे कृत्यनऊ महिने आपल्या पोटात वाढविणाऱ्या बाळाला जन्म देत तब्बल सात वर्षे सांभाळ करणारी आईच त्याच्या मृत्यूला कारणीभुत ठरली. पहिल्या पतीपासून वेगळे झाल्यांतर प्रियकरासोबत राहत असताना अनैतिक संबंधामध्ये पोटच्या मुलाची बाधा येऊ लागल्याचे समजून प्रियकराच्या मदतीने त्या चिमुकल्याचे भींतीवर डोके आपटून ठार मारत माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्याने संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयDeathमृत्यूMurderखूनArrestअटक