शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 01:15 IST

विधानसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम हा मतदारसंघ विविध प्रकारच्या राजकीय नाट्यमय घडामोडींमुळे सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळण्यापासून ते शिवसेनेच्या बंडखोरीसारख्या राजकीय घडामोडी सातत्याने चर्चेत राहिल्या आहेत. सेनेची बंडखोरी आणि माघारीनाट्याचा अंकही चांगलाच गाजला. राष्टÑवादीचा पाठिंबा ते अधिकृत उमेदवार अशा नाट्यमय घटनांनीदेखील चर्चेत राहिलेला मतदारसंघ आणखी एका कारणामुळे वेगळा ठरला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मतदारसंख्या असलेला हा मतदारसंघ असून, येथील मतदारांची संख्या ४ लाख १ हजार ५७७ इतकी आहे.

ठळक मुद्देउमेदवारांची संख्याही सर्वाधिक : दोन बॅलेट युनिटचा होणार वापर

नाशिक : विधानसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम हा मतदारसंघ विविध प्रकारच्या राजकीय नाट्यमय घडामोडींमुळे सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळण्यापासून ते शिवसेनेच्या बंडखोरीसारख्या राजकीय घडामोडी सातत्याने चर्चेत राहिल्या आहेत. सेनेची बंडखोरी आणि माघारीनाट्याचा अंकही चांगलाच गाजला. राष्टÑवादीचा पाठिंबा ते अधिकृत उमेदवार अशा नाट्यमय घटनांनीदेखील चर्चेत राहिलेला मतदारसंघ आणखी एका कारणामुळे वेगळा ठरला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मतदारसंख्या असलेला हा मतदारसंघ असून, येथील मतदारांची संख्या ४ लाख १ हजार ५७७ इतकी आहे.जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघापैकी नाशिक पश्चिम मतदारसंघात असलेल्या उमेदवारांची संख्यादेखील मोठी असून, मतदारांची संख्या चार लाखांच्या पुढे आहे. जिल्ह्यातील ही सर्वाधिक मतदारसंख्या ठरली आहे. २,१७,७११ पुरुष आणि १,८३,८६६ महिला मतदारांची संख्या आहे. पुरुष मतदारांची संख्या मोठी आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झाले असून, शहरातील नाशिक पश्चिम या मतदारसंघात १९ उमेदवार असल्याने या मतदारसंघात दोन बॅलेट युनिटवर मतदान घ्यावे लागणार आहे.एखाद्या मतदारसंघात पंधरांपेक्षा अधिक उमेदवार राहिल्यास अशा ठिकाणी दोन बॅलेट युनिटचा वापर करावा लागतो.नाशिक पूर्व मतदारसंघातील मतदारसंख्या ३ लाख ५५ हजार इतकी आहे. त्यामुळे हा मतदारसंघ पश्चिमनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे शहरातील हे दोन्ही मतदारसंघ अन्य मतदारसंघांच्या तुलनेत पहिल्या आणि दुसºया क्रमांकावरचे ठरले आहेत.मतदारसंघनिहाय मतदारसंख्यानांदगाव ३,१५,९९८४मालेगाव मध्य २,९६,६६७४मालेगाव बाह्य ३,४०,९११४बागलाण २,७६,२७२४कळवण २,६८,५६९४चांदवड २,७७,९५१४येवला २,९६,८०८४सिन्नर ३००५४२४निफाड २,७१,०५६४दिंडोरी ३०००२३नाशिक पूर्व ३,५५,१८८४नाशिक मध्य ३,१९,४ं६०४नाशिक पश्चिम ४,०१,५१७४देवळाली २,६४,१०८४इगतपुरी २,५९,५११४एकूण ४५,४४,६४१सर्वाधिक महिलामतदार पश्चिममध्येचमतदारसंघात सर्वाधिक मतदार असल्याने साहजिकच महिला मतदारांची संख्यादेखील येथे मोठी आहे. महिला मतदारांची संख्या १ लाख ८३ हजार ८६६ इतकी आहे, तर पुरुष मतदारांची संख्या २ लाख १७ हजार ७११ इतकी आहे. जिल्ह्यात सर्वात आघाड्यांवर पश्चिमची आकडेवारी मोठी दिसून येते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik-west-acनाशिक पश्चिमVotingमतदान