शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

उपधान तपातील  साधकांची सवाद्य शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:31 IST

लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम तीर्थधाम मध्ये सुरू असलेल्या उपधान तपातील साधकांची मंगळवारी नाशिकरोड परिसरातून सजविलेल्या बग्गीमधून वाजत-गाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

नाशिकरोड : लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम तीर्थधाम मध्ये सुरू असलेल्या उपधान तपातील साधकांची मंगळवारी नाशिकरोड परिसरातून सजविलेल्या बग्गीमधून वाजत-गाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शेकडो जैन साधू-साध्वी व हजारो जैन बांधव उपस्थित होते.लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम् तीर्थधाम मध्ये गेल्या ४८ दिवसांपासून गच्छाधिपती जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांच्या अधिपत्याखाली उपधान तप सुरू आहे. उपधान तपामध्ये विविध राज्यातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत व महिला साधक सहभागी झाले आहेत. उपधान तपाच्या सांगता निमित्त मंगळवारी सकाळी ९ वाजता आर्टिलरी सेंटररोड श्री मुनीसुव्रत स्वामी जैन मंदिरापासून उपधान तपात सहभागी झालेल्या साधकांची शोभायात्रा काढण्यात आली होती. विविध ठिकाणहून सजवून आणलेल्या बग्गीमध्ये साधक व त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. शोभायात्रेच्या अग्रभागी धार्मिकतेचे प्रतीक म्हणून इंद्रध्वजा त्यानंतर घोडेस्वार, बॅण्डपथक, विविध राज्यांच्या कलाकारांनी प्रादेशिक नृत्य व कला सादर करत सहभागी झाले होते. बग्गीमध्ये बसलेले साधक राजेशाही पेहराव करून सहभागी झाले होते.दोन किलोमीटर लांब शोभायात्राशोभायात्रेत जवळपास ४० बग्ग्या, घोडेस्वार, बॅण्ड-ढोल पथक, विविध राज्यांतील कलाकार, जैन बांधव, महिला हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्याने जवळपास दोन किलोमीटर लांब शोभायात्रा होती. शोभायात्रेतील श्री शांतीनाथ भगवानचा चंदेरी रथ, तसेच पूज्य आचार्य रामचंद्र सुरीश्वरजी महाराज, पूज्य आचार्य महाबल सुरीश्वरजी महाराज सहभागी झाले होते. ४८ दिवसांचे उपधान तप पूर्ण केल्यामुळे साधकांमध्ये प्रचंड उत्साह व आनंदाचे वातावरण पसरलेले दिसत होते. गच्छाधिपती जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज, आचार्य मुक्तिप्रभ सुरीश्वरजी, आचार्य अक्षयभद्र सुरीश्वरजी महाराज, आचार्य भव्यभूषण सुरीश्वरजी महाराज, आचार्य भवनभूषण सुरीश्वरजी महाराज, आचार्य पुण्यप्रभ सुरीश्वरजी महाराज यांच्यासह शेकडो जैन साधू-संत, साध्वी एका ठिकाणी उभे राहून शोभायात्रेतील साधक, जैन बांधव, भगिनी यांना आशीर्वाद देत होते. पोलिसांनी शोभायात्रा मार्गावर योग्य नियोजन केल्याने शोभायात्रा मोठ्या उत्साहात दुपारी ११.३० वाजता आर्टिलरी सेंटररोड येथील मनपाच्या मैदानावर समाप्त झाली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी संघपती कन्हैयालाल कर्नावट, डॉ. राजेंद्रकुमार मंडलेचा, डॉ. पी. एफ. ठोळे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, आयोजक संजय लुणावत, पृथ्वीराज बोरा, चेतन बोरा, संदीप कर्नावट, संतोष धाडीवाल, गिरीश शाह, प्रवीण लोढा, महेंद्र धाडीवाल, महेश शाह, सुनील बेदमुथा, अभय धाडीवाल, अ‍ॅड. सुशील जैन, विजय चोरडीया, अजित संकलेचा, सुनील चोरडीया, योगेश भंडारी, पारस संकलेचा, राजू बोथरा, वर्धमान जैन, विनय कर्नावट, रोशन टाटीया, अमोल पारख, प्रकाश लोढा, अमलोक भंडारी, अशोक कोचर, शैलेश चोरडिया, डॉ. शीतल पटनी, देवेन शाह, रूपेश चोपडा, अल्पेश खिंवसरा आदी उपस्थित होते.अकरा वर्षीय मुलीचा सहभाग४८ दिवसांचा उपधान तपात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील विरती पीयूश संचेती ही अकरा वर्षाची मुलगी सहभागी होऊन तिने उपधान तप पूर्ण केले. साध्वी स्मितदर्शनाजी म.सा., हितधर्माश्रीजी म.सा. यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली उपधान तप पूर्ण करता आला असे साधक विरती संचेती हिने सांगितले. उपधान तपात १९७ साधक सहभागी झाले होते.उपधान तपाची  आज समाप्तीलॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम् तीर्थधाममध्ये गेल्या ४८ दिवसांपासून सुरू असलेल्या उपधान तपाची सांगता बुधवार  n(२७ फेब्रुवारी) सकाळी ९ वाजता मोक्षमाळ कार्यक्रमाने होणार आहे. तपातील साधकांना ‘नवकार मंत्र जप करण्याचा अधिकार’ प्राप्त झाला. गच्छाधिपती जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज, आचार्य, साधू, साध्वी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोक्षमाळ कार्यक्रमाने उपधान तपाची सांगता होणार आहे.फुलांची-दिव्यांची मनमोहक सजावटकलापूर्णम तीर्थधाममध्ये संध्या महापूजा, स्त्रोत भक्ती व सत्कार कार्यक्रमानिमित्त फुलांची व दिव्यांची मनमोहक सजावट करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी उपधान तपातील साधकांची शोभायात्रा झाल्यानंतर कलापूर्णम तीर्थधाममध्ये सायंकाळी संध्या महापूजा व स्त्रोत भक्ती कार्यक्रम पार पडला. तसेच साधक, आयोजक व उपधान तप कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदत करणारे, वेगवेगळ्या एजन्सी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानिमित्त कलापूर्णम तीर्थधाम व मंदिरात सुगंधित फुलांची, फुलांच्या माळांची व रांगोळी काढुन आकर्षक सजावट करण्यात आली होती. सर्वत्र काचेच्या ग्लासमध्ये लावलेले दिव्यांचा मंद प्रकाश सजावटीची शोभा वाढवत होता. यावेळी जैन साधू-साध्वी, बांधव-भगिनी उपस्थित होते.

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरReligious programmeधार्मिक कार्यक्रम