शहरातील बहुतांशी रुग्णालयात ऑक्सिजनचा ठणठणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:15 IST2021-04-22T04:15:17+5:302021-04-22T04:15:17+5:30
शहरातील अनेक डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्येदेखील अशीच परिस्थिती होती. दुपारनंतर जे रुग्ण घरातच विलगीकरणात उपचार घेत होते, त्यांची प्रकृती खालावल्याने ...

शहरातील बहुतांशी रुग्णालयात ऑक्सिजनचा ठणठणात
शहरातील अनेक डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्येदेखील अशीच परिस्थिती होती. दुपारनंतर जे रुग्ण घरातच विलगीकरणात उपचार घेत होते, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाइकांची धावपळ उडाली. महापालिकेच्या ॲपवर ज्या ज्या रुग्णालयांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली. त्या रुग्णालयांशी संपर्क साधला असता, प्रत्येक रुग्णालयांकडून ऑक्सिजनचा पुरेसा साठा नसल्याचे तर काहींनी ऑक्सिजन नसल्याचे कारण देत रुग्ण दाखल करून घेण्यास नकार दिला. काही रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाइकांना ऑक्सिजन मिळत असेल तर रुग्ण घेऊन या असा हतबलतेचा सल्लाही दिला. शहरातील बहुतांशी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यानंतर सैरभैर अवस्था पहावयास मिळाली. सध्या ज्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत, त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाची धावपळ उडाली होती.