लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दोन दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील युवा शेतकºयाच्या आत्महत्येने जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ८१वर पोहचली असून, गेल्या वर्षी डिसेंबरअखेर ८७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदा आॅगस्टमध्ये सर्वाधिक १३ शेतकºयांनी जीवनयात्रा संपविली.नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जानेवारी महिन्यापासूनच दरमहा सात शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. जुलै महिन्यात सरकारने शेतकºयांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर सत्र थांबण्याची अपेक्षा होती. तथापि, याचाही परिणाम झाला नाही किंबहुना पाऊस पडूनही शेतकºयांच्या विचारात बदल झालेला नसल्याचा अनुमान काढला जात आहे. सोमवारी दिंडोरी तालुक्यातील देवठाण येथील सोमनाथ तानाजी गुंबाडे (२०) या तरुण शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या नावावर शेती व कर्ज नसले तरी, त्याच्या आजोबाच्या नावे कर्ज आहे. या प्रकरणी तहसीलदारांना सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच्या आत्महत्येने कर्जबाजारी शेतकºयांची संख्या ८१ वर पोहोचली आहे. चालू वर्षाचे अजून चार महिने शिल्लक आहेत. जीवनाला वैतागलेल्या शेतकºयांनी आत्महत्येचाच मार्ग अनुसरला तर संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कर्जमाफी, समाधानकारक पाऊस पडूनही आत्महत्येचे सत्र सुरूच राहिल्याने त्यावर काय उपाययोजना करता येईल, अशा विवंचनेत प्रशासन सापडले आहे.
आॅगस्टमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:09 IST