नाशिक : जिल्ह्यात २४३ उमेदवारांनी ३४५ अर्ज नामनिर्देशनपत्र दाखल केले असून, सर्वाधिक उमेदवार नाशिक पश्चिम आणि नांदगाव मतदारसंघात आहेत. या दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी ३० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रचंड राजकीय उलथापालथ झालेल्या नाशिक पश्चिम आणि नांदगाव मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष आहे. जिल्ह्यात भाजप-सेना मतदारसंघाची अदलाबदल करण्याची चर्चा सुरू झाली तेव्हा या दोन्ही मतदारसंघाचे नाव समोर आले होते. तेव्हापासून येथील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष होते. नांदगावमधून ३० उमेदवारांनी ४२, तर पश्चिममधून ३० उमेदवारांनी ४८ अर्ज दाखल केले आहेत.
नांदगाव, नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 01:31 IST