शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील मॉर्निंग वॉक ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 00:11 IST

नाशिक : वर्दळीच्या रस्त्यावर, महामार्गावर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांच्या जिवावर बेतल्याच्या दोन घटना गेल्या चार दिवसांत घडल्याने मॉर्निंग वॉक नेमका कुठे करावा, याविषयीच्या चर्चेला तोंड फुटले आहे. वाहतुकीच्या रस्त्यांवरील मॉर्निंग वॉक हा चुकीचाच असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

ठळक मुद्देअपघाताच्या घटना : व्यायामासाठी सुरक्षित जागेला द्या प्राधान्य

नाशिक : वर्दळीच्या रस्त्यावर, महामार्गावर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांच्या जिवावर बेतल्याच्या दोन घटना गेल्या चार दिवसांत घडल्याने मॉर्निंग वॉक नेमका कुठे करावा, याविषयीच्या चर्चेला तोंड फुटले आहे. वाहतुकीच्या रस्त्यांवरील मॉर्निंग वॉक हा चुकीचाच असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

गेल्या सप्ताहात पिंपळगाव बसवंतजवळ मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या तिघांना अज्ञात बसचालकाने जोरदार ठोकर दिल्याने त्यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पिंपळगाव शहरातील वैभव, राकेश, सोमनाथ हे दररोजप्रमाणे शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकवर निघाले असता, रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून येणाऱ्या अज्ञात बसचालकाने बेदरकारपणे बस चालवित पाठीमागून तिघांना जोराची धडक मारली होती. त्यात जखमी अवस्थेत असणाऱ्या दोघांना दवाखान्यात न नेता, बसचालक बस घेऊन फरार झाला होता. या अपघातात परिसरातील शिवाजीनगर कोळीवाडा येथे राहणाऱ्या वैभव दायमा या युवका मृत्यू झाला, तर राकेश वाघाले गंभीर जखमी होऊन सोमनाथ गायकवाड हा थोडक्यात बचावला होता.

दुसरी घटना गुरुवारी (दि.४) पहाटे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सामनेर या गावात घडली आहे. मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन महिलांना मागून आलेल्या चारचाकी वाहनाने चिरडल्याची भीषण घटना घडली. त्यात मनीषा साहेबराव पाटील व अनिता सहादू पाटील या दोन महिला ठार झाल्या. या घटनांमुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांच्या सुरतक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मॉर्निंग वॉक साठी शहरी तसेच ग्रामीण भागातही वर्दळीच्या रस्त्यावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत असते. रस्त्यांलगतच अनेक जण व्यायामाचेही प्रकारही करत असतात. याचवेळी वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे वर्दळीच्या रस्त्यांवरील मॉर्निंग वॉक हा असुरक्षित मानला जाऊ लागला आहे. त्यावर आता प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. शहरी भागात तर अनेक ठिकाणी जॉगिंग ट्रॅक उभारले असतानाही लोक रस्त्यावर येऊन मॉर्निंग वॉक करत असल्याचे दृष्य पाहायला मिळते. त्यातून अशा दुूर्दैवी अपघाताच्या घटना घडत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी मॉर्निंग वॉक हा मोकळ्या मैदानात अथवा वाहनांची वर्दळ नसलेल्या ठिकाणीच करावा, असाही एक मतप्रवाह पुढे आला आहे.मॉर्निंग वॉक करा, पण जपून...हल्ली डॉक्टरांकडून चालण्याच्या व्यायामाचा सल्ला दिला जातो. याशिवाय, प्रत्येक जण आपला फिटनेस सांभाळण्यासाठीही पहाटेच्या वेळी शुद्ध हवेत मॉर्निंग वॉकला प्राधान्य देतो. अनेकजण तर केवळ फॅशन म्हणूनही या मॉर्निंग वॉककडे बघतात. भर रस्त्यांवर मॉर्निंग वॉक होत असताना ये-जा करणाऱ्या वाहनांच्या प्रदूषणाचाही त्रास लोकांना होत असतो. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी सुरक्षित जागेला प्राधान्य देणे क्रमप्राप्त ठरते.

टॅग्स :Healthआरोग्यAccidentअपघात