प्रेमविवाहितांचा उद्या मेळावा

By Admin | Updated: February 12, 2016 23:34 IST2016-02-12T23:34:11+5:302016-02-12T23:34:43+5:30

प्रेमविवाहितांचा उद्या मेळावा

Morning gathering of lovers | प्रेमविवाहितांचा उद्या मेळावा

प्रेमविवाहितांचा उद्या मेळावा

नाशिक : कुटुंब सामाजिक संस्थेच्या वतीने रविवारी (दि. १४) सकाळी ११ वाजता आंतरजातीय, आंतरधर्मीय, प्रेमविवाहितांच्या कौटुंबिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांचे ‘आंतरजातीय विवाह : परिवर्तनवादी चळवळीचे महाद्वार’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
शरणपूररोड येथे रामायण बंगल्यासमोरच्या सावित्रीबाई फुले केंद्रात हा मेळावा होणार आहे. जातिधर्माची अमानवी बंधने झुगारून, अनंत अडचणींचा सामना करून, जातपंचायतीचे जाळे उद्ध्वस्त करीत एक नवा समाज निर्माण करणाऱ्या जोडप्यांचा सत्कार यावेळी शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच कुटुंब मार्गदर्शन केंद्र व हेल्पलाइन क्रमांकाचेही उद्घाटन होणार आहे. मेळाव्याला सर्व आंतरजातीय, आंतरधर्मीय, प्रेम विवाहितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अ‍ॅड. राजपालसिंग शिंदे, राजू देसले, युवराज बावा, मच्छिंद्र आव्हाड, प्रतीक अहेर, मोनल शिंदे यांनी केले आहे.

Web Title: Morning gathering of lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.