शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 21:01 IST

दहावीच्या परीक्षेसाठी सुमारे २ लाख १५ हजार ५९७  विद्यार्थ्यांचे, तर बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे १ लाख ६६ हजार ८१ विद्यार्थ्यांचे अर्ज नाशिक विभागीय माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाला प्राप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांना अजूनही अतिविशेष विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज सादर करण्याच्या नियमांनुसार परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत अर्ज सादर करण्याची सवलत उपलब्ध असल्याने या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्दे नाशिक जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी 97 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज बारावीच्या परीक्षेला 75 हजार विद्यार्थी होणार प्रविष्ठ

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाºया दहावीच्या परीक्षेसाठी सुमारे २ लाख १५ हजार ५९७  विद्यार्थ्यांचे, तर बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे १ लाख ६६ हजार ८१ विद्यार्थ्यांचे अर्ज नाशिक विभागीय माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाला प्राप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांना अजूनही अतिविशेष विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज सादर करण्याच्या नियमांनुसार परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत अर्ज सादर करण्याची सवलत उपलब्ध असल्याने या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर दहावीची परीक्षा ३ मार्चला सुरू होणार आहे. यात बारावीच्या परीक्षेला नाशिक विभागातून सुमारे १ लाख ६६ हजार विद्यार्थी प्रविष्ट होणार असून, यात नाशिक जिल्ह्यातील ७५ हजार ४५ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. तर दहावीचे २ लाख १५ हजार ५९७ अर्ज प्राप्त झाले असून, यात नाशिक जिल्ह्यातील सुमारे ९७ हजार ३७१ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष के. बी. पाटील यांनी दिली. विशेष परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक दिवस आधीपर्यंत अर्ज करण्याची संधी असल्याने यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले असून, मंडळाने विभागातील चारही जिल्ह्यांत परीक्षा केंद्रांचा आढावा घेण्याची तयारी सुरू केली आहे. परीक्षेचे  अंतिम वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून, बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी २०२० ते १८ मार्च २०२० या कालावधीत होणार आहे. तर दहावीची परीक्षा ३ ते २३ मार्च २०२० या कालावधीत होणार आहे. राज्य मंडळाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत एकाच वेळी परीक्षा घेण्यात येणार असून, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे स्वतंत्रपणे नियोजन करण्यात आले आहे.  संबंधित वेळापत्रक परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थीexamपरीक्षा