‘स्वाइन फ्लू’चा जिल्ह्याबाहेर अधिक फैलाव
By Admin | Updated: May 17, 2015 23:37 IST2015-05-17T23:30:47+5:302015-05-17T23:37:02+5:30
‘स्वाइन फ्लू’चा जिल्ह्याबाहेर अधिक फैलाव

‘स्वाइन फ्लू’चा जिल्ह्याबाहेर अधिक फैलाव
नाशिक : जिल्ह्णात स्वाइन फ्लू आटोक्यात आला असला तरी लगतच्या जिल्ह्णामध्ये मात्र तो वाढत असल्याचे चित्र आहे़ जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात इतर जिल्ह्णातील रुग्ण अधिक असल्याचे समोर आले आहे़ सद्यस्थितीत दोन महिला, एक लहान मुलगा व एक पुरुष असे चौघे संशयित उपचार घेत असून, मुलाची प्रकृती गंभीर आहे़
जानेवारीपासून स्वाइन फ्लूचा जोर प्रामुख्याने वाढला होता़ तसेच एप्रिलपर्यंत हजारो रुग्णांची तपासणी करण्यात येऊन पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केल्यानंतर त्यातील बहुतांशी रुग्ण बरेही झाले़ मे महिन्यातील उन्हामुळे सुरुवातील स्वाइन फ्लूचा जोर कमी झाला होता़ मात्र, गेल्या एक - दोन दिवसांपासून तो पुन्हा वाढला आहे़ त्यात नाशिक जिल्ह्णालगत असलेल्या जिल्ह्णांमध्ये त्याचा फैलाव झाल्याचे दिसून येते़
जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात जव्हार व कोपरगाव येथील दोन गर्भवती स्त्रिया उपचार घेत असून, त्यांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ मालेगावचा एक चारवर्षीय मुलाचा तपासणी अहवालदेखील पॉझिटीव्ह असून, त्याची प्रकृती गंभीर आहे़ गेल्या पंधरा दिवसांपासून हा मुलगा मालेगाव तसेच नाशिक शहरातील मोठ्या खासगी रुग्णांलयांमध्ये उपचार घेत होता़ याबरोबरच अकोला जिल्ह्णातील एक पुरुष उपचार घेत आहेत.(प्रतिनिधी)