शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत दीड हजारांवरून अधिक जागा रिक्त

By admin | Updated: February 28, 2017 02:12 IST

नाशिक : महापालिकेत दर महिन्याला सेवानिवृत्त होणारे कर्मचारी आणि वाढत्या लोकसंख्येच्या आधारे लागणारे वाढीव कर्मचारी याचा विचार केला तर महापालिकेत १६३३ कर्मचाऱ्यांची गरज आहे

नाशिक : महापालिकेत दर महिन्याला सेवानिवृत्त होणारे कर्मचारी आणि वाढत्या लोकसंख्येच्या आधारे लागणारे वाढीव कर्मचारी याचा विचार केला तर महापालिकेत १६३३ कर्मचाऱ्यांची गरज आहे. तसे आस्थापना विवरण पत्र सोमवारी (दि.२७) स्थायी समितीने मंजूर केले. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना आता सातव्या वेतन आयोगानुसार वेतन अदा करण्यासाठी चाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.महापालिकेचे आस्थापना विवरणपत्र दरवर्षी स्थायी समितीवर मंजूर करून घ्यावे लागते. त्यानुसार यंदा समितीच्या अखेरच्या बैठकीत आस्थापना विवरण पत्र मांडून ते मंजूर करून घेण्यात आले. नाशिक महापालिकेत एकूण सात हजार ९० कर्मचारी पदे मंजूर आहेत. तथापि, दरवर्षी सेवानिवृत्त होणारे कर्मचारी बघता सध्या महापालिकेत केवळ पाच हजार ४३४ कर्मचारी आहेत. आणखी १ हजार ६३३ कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे, असे नमूद करण्यात आले. सध्याच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते तसेच सेवानिवृत्ती वेतन यासाठी ३४४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. दरम्यान, गंगापूर येथे मलनिस्सारण केंद्र बांधण्यासाठी ३१ कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. महापालिकेचे हे केंद्र व्हावे यासाठी गेल्या आठ ते दहा वर्षांपासून हा विषय गाजत आहे. विशेष म्हणजे महापालिकेने या केंद्रासाठी नियोजित जागा ताब्यात आली नसताना केंद्र बांधण्याच्या कामाच्या निविदा पाच वर्षांपूर्वीच काढल्या होत्या. त्या मंजूरही झाल्या होत्या. त्यानंतर सत्ता बदल झाल्यानंतर हा विषय वादात सापडला होता. (प्रतिनिधी)