शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
4
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
5
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
6
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
7
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
8
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
9
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
10
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
11
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
12
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
13
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
15
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
16
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
17
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
18
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
19
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
20
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे

अभियांत्रिकीच्या निम्म्याहून अधिक जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 01:26 IST

ठराविक तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ होत असताना काही अभियांत्रिकी महाविद्यालयांची मात्र विद्यार्थ्यांअभावी दैना उडाली आहे.

नाशिक : ठराविक तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ होत असताना काही अभियांत्रिकी महाविद्यालयांची मात्र विद्यार्थ्यांअभावी दैना उडाली आहे. प्रवेशक्षमतेच्या ३५ टक्के ही विद्यार्थी न मिळालेल्या महाविद्यालयांची राज्यातील आकडेवाडी फुगत चाललेली असताना नाशिक विभागात अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या १६ हजार ७८० पैकी ८ हजार ४२४ जागा म्हणजेच निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या अनेक तुकड्यांमध्ये अत्यल्प विद्यार्थ्यांनी प्र्रवेश घेतल्याची शक्यता असल्याने अशा शाखा पुढील चार वर्ष सुरू ठेवण्याचे आव्हान महाविद्यालयांसमोर निर्माण होणार आहे.  अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे नियमन करणाऱ्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) निकष पाळायचे तर एका अभियांत्रिकी महाविद्यालयाकरिता आजच्या घडीला ९० ते १०० कोटी रुपये इतकी प्रचंड गुंतवणूक करावी लागते. त्यातून खर्चावर आधारित शुल्करचना असल्याने पूर्ण प्रवेश झाले तरच महाविद्यालय चालविणे संस्थाचालकांना परवडू शकते. परंतु, अनेक महाविद्यालयांमध्ये क्षमतेच्या तुलनेत ३५ ते ५० टक्के जागा भरल्या आहेत. तर काही महाविद्यालयांना एवढ्या जागा भरण्यातही यश आलेले नाही. अशा परिस्थितीत नाशिक विभागात प्रथम वर्षाच्या १६ हजार ७८० पैकी केवळ ८ हजार २६६ प्रवेश झाले असून, ८ हजार ४२४ जागा म्हणजेच निम्म्याहून अधिक जागा रिक्त आहेत. तर अभियांत्रिकी पदवीनंतर थेट द्वितीय वर्ष प्रवेशाच्या १३ हजार ९०७ जागांपैकी ७ हजार ८२३ जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, ६ हजार ८४ जागा रिक्त आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी कुठे चार, कुठे आठ असे विद्यार्थी मिळाल्याने ही महाविद्यालये पुढची चार वर्षे चालणार तरी कशी असा प्रश्न  निर्माण झाला असतानाच्विद्यार्थ्यांच्या प्रवेशाअभावी विभागात विविध महाविद्यालयांमधील वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या जवळपास दीडशे तुकड्या बंद करण्यात आल्या  होत्या.३१ आॅगस्टला ‘कट आॅफ’४सध्या कोणत्या महाविद्यालयात किती प्रवेश झाले याची आकडेवारी समोर आलेली नाही. परंतु ३१ आॅगस्टला २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकी प्रवेशाचा क ट आॅफ जाहीर होणार असून, त्यानंतर विभागातील किती महाविद्यालयांमध्ये किती तुकड्या चालणार आणि कोणत्या महाविद्यालयांच्या किती वर्गखोल्यांना कुलूप लावावे लागणार हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी