निम्म्याहून अधिक कोरोनायोद्धे दुसऱ्या डोसपासून वंचित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 03:20 PM2021-05-16T15:20:24+5:302021-05-16T15:21:05+5:30

नाशिक : जिल्ह्यात प्रारंभीच्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना आणि फ्रंटलाईन वर्कर्सना प्राधान्य देण्यात आले होते. त्यामुळेच पहिल्या डोसचा लाभ या दोन्ही श्रेणीत येणाऱ्या १ लाख २८ हजार ९११ कर्मचाऱ्यांना झाला होता. मात्र फेब्रुवारी, मार्चपासून दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेल्यावरही अद्याप ५९८२५ नागरिकांनाच दुसरा डोस देण्यात आला असून उर्वरीत सुमारे ६९ हजार फ्रंटलाईन वर्कर्स अद्यापही दुसऱ्या डोसपासून वंचित राहिले असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.

More than half of the coronary arteries are deprived of a second dose! | निम्म्याहून अधिक कोरोनायोद्धे दुसऱ्या डोसपासून वंचित !

निम्म्याहून अधिक कोरोनायोद्धे दुसऱ्या डोसपासून वंचित !

Next
ठळक मुद्देअनास्था : फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून प्राधान्याने पहिली डोस मिळाल्यानंतर मात्र प्राधान्यक्रम नाही

नाशिक : जिल्ह्यात प्रारंभीच्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना आणि फ्रंटलाईन वर्कर्सना प्राधान्य देण्यात आले होते. त्यामुळेच पहिल्या डोसचा लाभ या दोन्ही श्रेणीत येणाऱ्या १ लाख २८ हजार ९११ कर्मचाऱ्यांना झाला होता. मात्र फेब्रुवारी, मार्चपासून दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेल्यावरही अद्याप ५९८२५ नागरिकांनाच दुसरा डोस देण्यात आला असून उर्वरीत सुमारे ६९ हजार फ्रंटलाईन वर्कर्स अद्यापही दुसऱ्या डोसपासून वंचित राहिले असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.

कोरोना काळात ह्यफ्रंट लाईनह्ण वर्कर म्हणून पोलीसांपासून विविध घटकांनी काम केले. त्या सर्व घटकांना प्रारंभीच्या टप्प्यात पहिला डोस देण्यात तत्परता दाखविण्यात आली. मात्र, दुसऱ्या डोसमध्ये तशा स्वरुपाची तत्परता किंवा प्राधान्यक्रम दिला गेला नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांना दुसऱ्या लसीसाठी प्रयत्न करावे लागले. त्यामुळे किमान काही प्रमाणात तरी त्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. परंतू, त्यांच्या कुटूंबातील सदस्यांचे लसीकरण झालेले नसल्याने अनेक सदस्य बाधित होत असल्याचे समोर आले आहे. पोलीसांसह असे अन्य फ्रंटलाईन वर्कर्स घरी गेल्यानंतर त्यांच्या कुटूंबातील पत्नी, लहान मुले, वृद्धांशी त्यांचा संपर्क येतो. त्यामुळे त्यांना करोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने करोनाचा विषाणू त्यांच्या कुटूंबीयांपर्यंत जात असल्याने अनेकांना संसर्ग होत असल्याचे पुढे आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवसरात्र झटणार्‍या या फ्रंटलाईन वर्कर्सना एकीकडे कोरोनाशी तसेच दुसरीकडे कुटुंबातील कुणालाही ही लागण होऊ नये, यासाठी झटावे लागते. गत सव्वा वर्षांपासून सर्व फ्रंटलाईन वर्कर्स आणि कोरोना योद्धे कर्मचारी कोरोनाशी लढा देत आहे. पहिल्या लाटेत त्यातील अनेक कर्मचारी बाधित झाले. काहींचे निधन झाले. तर काही बरे होऊन पुन्हा कार्यरत झाले. फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर या फ्रंटलाईन वर्कर्सना पुन्हा त्यांच्या कामात जुंपून घ्यावे लागले. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुमारे निम्म्याहून अधिक कोरोना फ्रंटलाईन वर्कर्स दुसऱ्या डोसपासून वंचित राहिले आहेत.

Web Title: More than half of the coronary arteries are deprived of a second dose!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.