शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

एमपीएससी ‘डमी’ विद्यार्थी प्रकरणी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:18 IST

२००९ ते २०१७ या कालावधीत झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील डमी विद्यार्थी आणि अधिकाºयांचे रॅकेट उघड झाले़ या रॅकेटचा विस्तार राज्यभर पसरलेला असल्याने या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीबीआयकडे देण्याची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींनी बुधवारी (दि़ ३१) जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे़

नाशिक : २००९ ते २०१७ या कालावधीत झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील डमी विद्यार्थी आणि अधिकाºयांचे रॅकेट उघड झाले़ या रॅकेटचा विस्तार राज्यभर पसरलेला असल्याने या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीबीआयकडे देण्याची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा च्या परीक्षार्थींनी बुधवारी (दि़ ३१) जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे़ मुख्यमंत्र्यांनी गैरमार्गाने प्रशासन सेवेत आलेल्यांवर कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे़  शालिमार परिसरातील बी़ डी़ भालेकर मैदानापासून सुरू झालेला हा मूक मोर्चा शालिमार, एमजीरोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला़ महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातील बोगस नोकरभरती उघड झाली असून, भायखळा पोलिसांनी पाच जणांना, तर विक्रीकर निरीक्षक परीक्षेत डमी उमेदवार बसविणाºया नांदेडच्या दोघांना अटकही केली आहे़ २००९ पासून सुरू असलेल्या या भरतीप्रक्रियेशी अटक करण्यात आलेल्या संशयितांचा संबंध असण्याची शक्यता असून, एकंदरीतच आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका घेतली जाते आहे़राज्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया परीक्षार्थींची संख्या दहा लाखांच्या आसपास असून, प्रशासन सेवेत येण्यासाठी विद्यार्थी कठोर मेहनत घेतात; मात्र या भरतीप्रक्रियेतच जर गैरप्रकार होत असतील तर आयोगाची कार्यपद्धती व कार्यक्षमतेवरच प्रश्न निर्माण झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे़  राज्य लोकसेवा आयोगासोबत संधान साधून गैरमार्गाने प्रशासकीय सेवेत येणारे नागरिकांच्या समस्या कशा सोडविणार, प्रामाणिकपणे अभ्यास करणाºयांचे काय, असे अनेक सवाल परीक्षार्थींनी उपस्थित केले़ या प्रकरणाची संपर्णू  सीबीआय मार्फत चौकशी करावी तसेच गैरमार्गाने अधिकारी झालेल्यांना कायमस्वरूपी निलंबित करावे या मागण्या करण्यात आल्या असून, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ या मोर्चामध्ये अजित देशमुख, अनुराग चिंचोरे, किरण ताडगे, ज्ञानेश्वर घोटेकर, सतीश शहाणे, योगिता कदम, उषा पवार, नेहा कोटक यांच्यासह परीक्षार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ परीक्षार्थींच्या मागण्या  नाशिकला विभागीय मुख्यालय करावे़ ,  परीक्षार्थींची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेतली जावी ,  रद्द केल्या जाणाºया प्रश्नांचे संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावे़ , परीक्षा केंद्रावर मोबाइल जॅमर सिस्टिम असावी़ ,  ३० टक्के कपातीची बंदी उठवावी. , सरळ सेवेतील महसूल, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, समाजकल्याण, महिला व बालविकास तसेच इतर अनुषंगिक विभागातील वर्ग ३ ते वर्ग १ ची विविध पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात यावीत.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी