चोरीचे सोने खरेदी करणाºयांना मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:19 IST2017-09-27T00:18:57+5:302017-09-27T00:19:03+5:30
शहरातील चेनस्ॅनचिंग व जबरी चोरीच्या घटना रोखण्यासाठी गस्त वाढविण्यात आली असून, भिवंडी येथील सराईत सोनसाखळी चोरटा इकबाल सैफउल्ला बेग ऊर्फ जाफरी (रा. भिवंडी) याच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ याबरोबरच चोरीचे सोने खरेदी करणारे तिघे जणांची माहिती मिळाली असून, त्यांच्यावर मोक्कान्वये कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली़

चोरीचे सोने खरेदी करणाºयांना मोक्का
नाशिक : शहरातील चेनस्ॅनचिंग व जबरी चोरीच्या घटना रोखण्यासाठी गस्त वाढविण्यात आली असून, भिवंडी येथील सराईत सोनसाखळी चोरटा इकबाल सैफउल्ला बेग ऊर्फ जाफरी (रा. भिवंडी) याच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ याबरोबरच चोरीचे सोने खरेदी करणारे तिघे जणांची माहिती मिळाली असून, त्यांच्यावर मोक्कान्वये कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली़ शहरातील वाढत्या घटनांना पायबंद घालण्याच्या सूचना गुन्हे शाखेचे युनिट एक, दोन तसेच शहरातील तेरा पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत़ युनिट एकचे पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी भिवंडी येथील संशयित इकबाल सैफउल्ला बेग उर्फ जाफरी यास अटक केली़ त्याने पोलीस कस्टडी रिमांडमध्ये १४ सप्टेंबरला शहरात तोतया पोलीस बनून सोन्याच्या बांगड्या तसेच अंबडमध्ये सोनसाखळी खेचल्याची कबुली दिली आहे़ संशयित बेगकडून साडेआठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा सुमारे दोन लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़ त्याच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल केली जाणार आहे़ दरम्यान, सोनसाखळी चोरट्यांकडून चोरीचे सोने खरेदी करणारे तीन संशयितांची माहिती मिळाली असून, त्यांच्यावर मोक्कान्वये कारवाईचा प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे सिंगल यांनी सांगितले़
दुचाकी चोरट्यांकडून विनाकागदपत्र वाहन विकत घेणाºयांवर आता यापुढे ४११ कलमान्वये गुन्हा दाखल केला जाणार आहे़ नागरिकांनी वाहन विकत घेताना त्याची प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) वा पोलिसांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे़ - विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त, नाशिक