अंध व्यक्तींसाठी महिनाभराचा किराणा, काठी वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:11 IST2021-07-04T04:11:12+5:302021-07-04T04:11:12+5:30
सिन्नर: समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी तसेच त्यांना मदत करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ सिन्नर सिटीचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. ...

अंध व्यक्तींसाठी महिनाभराचा किराणा, काठी वाटप
सिन्नर: समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी तसेच त्यांना मदत करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ सिन्नर सिटीचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. यापुढेही रोटरी आपली सामाजिक बांधिलकी अधिक जबाबदारीने निभावेल, असे प्रतिपादन रोटरीचे अध्यक्ष वैभव मुत्रक यांनी केले. रोटरी क्लब सिन्नर सिटीच्या वतीने उद्योग भवन येथील ढाणे लॉजिस्टिक येथे सिन्नर शहरासह तालुक्यातील अंध व्यक्तींसाठी महिनाभराचा किराणा तसेच काठी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी १६ अंध व्यक्तींना महिनाभराचा किराणा व २८ काठ्यांचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते अंध व्यक्तींना वितरण करण्यात आले. रोटरीचे सुनील ढाणे व चंद्रशेखर देवरे यांचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभले. सचिव नाना भगत यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी रोटरी क्लबचे संजय आनेराव, माजी अध्यक्ष उदय साळी, निशांत माहेश्वरी उपस्थित होते.