एकाधिकारशाहीने लोकशाही धोक्यात

By Admin | Updated: April 10, 2017 02:12 IST2017-04-10T02:12:43+5:302017-04-10T02:12:53+5:30

नाशिक : सरकारमधील मंत्र्यांना निर्णयचे स्वातंत्र्य दिले नसून अजेंड्याशिवाय बैठकांमध्ये ठराव मांडत ते मंजूर करून घेतले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी व्यक्त केली.

Monopolistic threat to democracy | एकाधिकारशाहीने लोकशाही धोक्यात

एकाधिकारशाहीने लोकशाही धोक्यात

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारमधील मंत्र्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले नसून कोणत्याही मूलभूत अजेंड्याशिवाय कॅबिनेटच्या बैठकांमध्ये ऐनवेळी ठराव मांडत ते मंजूर करून घेतले जात असल्याचा घणाघाती आरोप करतानाच येत्या काळात लोकसभेसह राज्यसभेत भाजपाचे बहुमत झाल्यास या सरकारकडून घटना बदलण्याचा प्रयत्न होऊन देशातील लोकशाहीला धोका उद्भवण्याची भीती राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
नाशिक जैन सेवा कार्य समितीतर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवात ‘भारतीय लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, बेबीलाल संचेती, किसनलाल बोरा, संपतलाल सुराणा, राजेंद्र ब्रह्मेचा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर आदि उपस्थित होते. याप्रसंगी जैन समाजातील विविध क्षेत्रात यशस्वी कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. चव्हाण म्हणाले, गेल्या लोकसभा तथा विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला अधिक जागा मिळाल्या असल्या तरी या पक्षाला मिळालेल्या मतदानाचा टक्का कमी आहे. सर्व विरोधी पक्षांना मिळालेली मतदानाची टक्केवारी अधिक आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेविषयी फेरविचार होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आदि देशांच्या निवडणूक प्रक्रियांचा अभ्यास करून भारतीय निवडणूक प्रक्रि येत शक्य असलेल्या बदलांचा विचार होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Monopolistic threat to democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.