सप्तशृंगगडावर विजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू

By Admin | Updated: July 31, 2016 00:20 IST2016-07-30T23:51:43+5:302016-07-31T00:20:31+5:30

सप्तशृंगगडावर विजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू

Monkey's death with power shock at Saptashringag | सप्तशृंगगडावर विजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू

सप्तशृंगगडावर विजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू


सप्तशृंगगड : सप्तशृंगगडावर गावात आलेल्या एका माकडाचा शनिवारी दुपारी अचानक विजेच्या खांबावरील तारेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
देवी संस्थानच्या भक्तनिवास परिसरातील प्रसादालयाकडील भागात एका विद्युत खांबावर शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गडावरील मंदिर परिसरात पावसाळ्यात माकडांना खाण्यासाठी फारसे काही मिळत नसते. त्यामुळे अन्नाच्या शोधार्थ माकडे गावात भंटकती करताना दिसतात. गावात आलेले माकड विजेच्या खांबावरून उडी मारत असताना तारेला लोबंकळल्याने त्यास विजेचा धक्का लागून ते खाली पडले व यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला.(वार्ताहर)




 

Web Title: Monkey's death with power shock at Saptashringag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.