माकडाची जोडी जेरबंद
By Admin | Updated: April 10, 2017 01:11 IST2017-04-10T01:11:35+5:302017-04-10T01:11:53+5:30
वणी : गेल्या काही दिवसांपासून वणीकरांना अस्वस्थ करणाऱ्या माकडाच्या एका जोडीला वनविभागाने जेरबंद केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे

माकडाची जोडी जेरबंद
वणी : गेल्या काही दिवसांपासून वणीकरांना अस्वस्थ करणाऱ्या माकडाच्या एका जोडीला वनविभागाने जेरबंद केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ही जोडी नर-मादी असल्याने त्यांना गमतीने आर्ची-परशाची जोडी संबोधले जात होते.
आज वनविभागाने अखेर आर्ची व परश्यास जेरबंद करून वणीकर नागरिकांची सुटका केल्याने वणीत समाधानाचे वातावरण आहे
वणी गावात एक नर व एक मादी माकड सुमारे चार महिन्यांपासून तळ ठोकून होते. त्यांनी काही नागरिकांना चावादेखील घेतला, तर काही त्यांच्या मर्कट लीलांनी जखमीदेखील झाले. वन कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडण्यासाठी मोहिमादेखील राबवल्या पण उपयोग झाला नाही.
या मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाडेकर, पशुसंवर्धन उपआयुक्त संजय गायकवाड, पशुधन विकास अधिकारी पाईकराव, वन कर्मचारी शरद मोगरे, बालाजी झम्पलवाड, बंगाळ, रमेश झुरडे आदिंनी सहभाग घेतला. (वार्ताहर)