For the money in Yeola, the child murdered his mother | येवल्यात पैशासाठी मुलाने केला आईचा खून
येवल्यात पैशासाठी मुलाने केला आईचा खून

येवला : मौज-मजेसाठी आईने पैसे दिले नाही म्हणून मुलाने आईचाच खून केल्याची दुर्दैवी घटना येवल्यातील बुंदेलपुरा भागात शनिवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी रविवारी येवला पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
शहरातील बुंदेलपुरा भागात राजू ऊर्फ राजेंद्र गुजर (२८) याने आई लीलाबाई कांतिलाल गुजर (७०) यांच्याकडे मौजमजेसाठी पैशांची मागणी केली. (पान ५ वर)
मात्र नकार दिल्याने शिवीगाळ करीत त्याने जबर मारहाण केल्याने यात आईचा मृत्यू झाला. राजेंद्र हा कुसंगतीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबीयांना त्रास देत होता. शनिवारी रात्री त्याने आईकडे पैशांची मागणी केली. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने राजू याने त्यांना मारहाण केली. त्यांना उपचारार्थ ग्रामीण रु ग्णालयात दाखल नेले असता त्या मयत झाल्या होत्या. याबाबत आरोपीचा भाऊ संदीप गुजर याने येवला शहर पोलीस ठाण्यात तक्र ार नोंदवली. त्यानुसार येवला शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक मनमाड आर. रागसुधा, येवला शहर पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे यांनी भेट देऊन आरोपीस तत्काळ अटक करण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे, चद्रकांत निर्मळ, हवालदार अतुल फलके, विजय पैठणकर करीत आहेत.


Web Title:  For the money in Yeola, the child murdered his mother
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.