शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

मनी एक ध्यास, मनी एक आस, तुझ्या दर्शनाची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:19 IST

रीमध्ये यंदा नाशिक जिल्ह्यातील सर्व वारकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसतो. कारण संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ मंदिर जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. शेकडो वर्षांपासून वारकऱ्यांचे डोळे या कार्यासाठी आसुसलेले आहेत. त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ मंदिराचे स्वप्न आता साकार होत असल्याने सर्व वारीतील वारकºयांमध्ये यासंबंधी चर्चा होताना दिसते.

पंडित महाराज कोल्हेवारीमध्ये यंदा नाशिक जिल्ह्यातील सर्व वारकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसतो. कारण संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ मंदिर जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. शेकडो वर्षांपासून वारकऱ्यांचे डोळे या कार्यासाठी आसुसलेले आहेत. त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ मंदिराचे स्वप्न आता साकार होत असल्याने सर्व वारीतील वारकºयांमध्ये यासंबंधी चर्चा होताना दिसते.मला स्वत:लादेखील या गोष्टीचा अपार आनंद होत आहे. एकप्रकारचे आत्मिक समाधान लाभत आहे. सर्व वारकरी घरापासून दूर असले तरी त्यांच्या डोळ्यासमोर जणू संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांचे मंदिर आहे. वारीत चालताना वारकरी हे तहान-भूक विसरून चालत राहतात. कमी सुविधेमध्येही जीवन कसे जगावे हे वारी आपणाला शिकविते.स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असा भेदभाव वारीमध्ये सहजपणे विसरला जातो. एकप्रकारे सर्वांमध्ये समन्वयाची भूमिका निर्माण होते. दाहीदिशा फक्त भजनाचा नाद कानावर पडत असतो. त्या आनंदामध्ये माणूस स्वत:चे अस्तित्व हरवून जातो. यावर्षी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संस्थान ट्रस्टच्या वतीने प्रत्येक मुक्कामी पाच वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार दरमुक्कामी वारकरी हे कार्य पार पाडीत आहेत. आकाशातून अलगद पडणारा पाऊस आणि मुखामध्ये हरिनाम याचा आनंद काही वेगळाच असतो. वारीमध्ये हा आनंद सर्व वारकºयांना हा अत्यानंद देऊन जातो. परंतु वारकºयांना पंढरपूरपर्यंत काही बाधा पोहोचू नये, यासाठी यंदा शासनाच्या वतीने निर्मल वारीच्या माध्यमातून रेनकोट वाटप करण्यात आले आहेत. परंतु वारकरी हा ऊन, वारा, पाऊस याची पर्वा करीत नाही. वारीमध्ये कोणतीही सोयीसुविधा नसताना वारकºयांच्या मनाची अशी काही अवस्था होऊन जाते की, आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोहमयी संसारातून घरापासून दूर वाटचाल करीत असतो़ मिळेल ते अन्नपाणी सेवन करून वारकरी दरकोस, दरमुक्कामी अखंडपणे हरिनामाचा जप करत असतो़ वारीमध्ये आसरा मिळेल तेथे थांबायचे आणि गावकरी किंवा वारीतील संयोजक देतील ते खायचे, असे त्याचे दैनंदिन कार्य असते. फक्त पुढे पुढे जायचे हाच एक ध्यास आणि उद्देश त्याच्या मनामध्ये असतो. ‘मनी एक ध्यास, मनी एक आस तुझ्या दर्शनाची, तुझ्या चरणाची धूळ लागो माझ्या माथी’ अशी वारकºयांच्या मनाची भावना झालेली असते.वारीत आपल्याला आचाराचा आणि विचारांचा समन्वय दिसून येतो़ अवघे धरू सुपंथ असा विचार घेऊन प्रत्येक वारकरी वारीत सहभागी झालेला असतो़ कुणाच्या हातात भगवा झेंडा तर कुणाच्या हातात टाळ-वीणा असते़ तर महिला वारकºयांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, तांब्याचा कलश असते़ सर्वजण वाटचाल करताना ऊन, वारा, पाऊस याची पर्वा करत नाहीत़ कुणाला काही अडचणी असेल तर लगेच धावून जातो आपल्या घासातील घास दुसºयाला देतो़ तसेच एकमेकाला पाणी देणे, कुणी आजारी असेल तर त्याची सेवा करणे अशी कामे करणे़ वारीमध्ये वारकरी करीत असतात़ त्याचप्रमाणे एकमेकांचे सुख-दु:ख वाटून घेतात़ एकमेकांच्या समस्या जाणून सर्वांना धीर देतात़ महाराष्ट्रातील कानाकोपºयातून अनेक संतांच्या पालख्या निघतात़ त्याचबरोबर वारकºयांच्या असतात़ प्रत्येक वारकरी रोज सुमारे २० किमी पायी चालतो़ मुखी हरिनामाचा जप असल्याचा त्यांना हे अंतर पार करणे शक्य होते़ त्यात त्यांना कोणत्याही प्रकारचे श्रम वाटत नाही़ कारण त्यांचे मन आणि शरीर भक्तिमय होऊन गेलेले असते़ त्यांना फक्त विठ्ठल दर्शनाची आस लागलेली असते़ वारीमध्ये सहभागी होणारे आणि वारीत प्रत्यक्ष सहभागी न होता अन्नदान व अन्य प्रकारची मदत करणारे हे दोन्हीही वारकरीच होत. एकंदरीत वारीचा उद्देश काय तर भगवंताची सेवा अर्थात गोरगरिबांची सेवा होय. वारी म्हणजे एकप्रकारचा आनंदाचा महासागर होय़ याठिकाणी प्रत्येकजण आपले संसारिक दु:ख बाजूला ठेवून विठू माऊलीच्या भजनात तल्लीन झालेला असतो़ भजन कीर्तनात वारकरी रात्रंदिवस दंग झालेले असतो़ असा हा वारीचा आनंद सुख सोहळा असतो़(लेखक संत निवृत्तिनाथ  समाधी संस्थानचे अध्यक्ष आहेत.)

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Wariपंढरपूर वारी