मंदिरातील दानपेटी फोडून पैसे लंपास

By Admin | Updated: September 30, 2016 01:03 IST2016-09-30T01:01:18+5:302016-09-30T01:03:12+5:30

मंदिरातील दानपेटी फोडून पैसे लंपास

Money laundering blocks in the temple | मंदिरातील दानपेटी फोडून पैसे लंपास

मंदिरातील दानपेटी फोडून पैसे लंपास


मातोरी : गावातील मातुलेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी लोखंडी गजाच्या साहाय्याने फोडून सात ते आठ हजार रुपये लंपास केले. या प्रकारामुळे गावकरी व भक्त मंडळीत संतापाची लाट उसळली आहे.
गावाचे श्रद्धास्थान असलेल्या मातुलेश्वर मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास मंदिरास लावलेले कुलूप लोखंडी गजाच्या साहाय्याने तोडून मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून अंदाजे सात ते आठ हजार रुपयांची चोरी केली. हा प्रकार सकाळी नेहमीप्रमाणे दर्शनास येणाऱ्या भक्त मंडळीच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलीसपाटील रमेश पिंगळे यास खबर दिली असता त्यांनी तालुका पोलीस स्थानकास कळविले. (वार्ताहर)

Web Title: Money laundering blocks in the temple