शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

दोन सत्रांत कामकाज : सोमवारपासून न्यायालये ' बिगेन अगेन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 21:45 IST

न्यायालयांची वर्गवारी करण्यात आली असून त्यात रेड झोनमध्ये असलेल्या महापालिकांमध्ये असलेले न्यायालये 'ए' वर्गवारीत

ठळक मुद्दे 'बार'ची सभा वेबिनारद्वारेमनपा कार्यक्षेत्रातील न्यायालये 'ए' वर्गात

नाशिक : लॉकडाऊननतर सोमवारपासून (दि.८) न्यायालयांचे कामकाज सकाळी १० ते १ आणि दुपारी २.३० ते ५.३० अशा दोन सत्रांमध्ये होणार आहे. त्याचप्रमाणे न्यायालयीन कामकाज ऑनलाइन पद्धतीने अधिक व्हावे, यासाठी नाशिक बार असोसिएशनच्या वतीने ई गव्हर्नन्स आणि ई फायलिंग सेंटर उभारण्यासाठी मागणी करण्याचा ठराव मंजुर करण्यात आला. त्यामुळे भविष्यात हे सेंटर कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने देशभरात लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्येही कर्मचारी कपात करुन कामकाज सुरु होते. त्याचप्रमाणे न्यायालयातही कर्मचारी व न्यायाधीशांच्या कामकाजाचे स्वरुप बदलले होते. मोजके न्यायाधीश व कर्मचाऱ्यांच्या मदतीने फक्त अतिमहत्वाचे व दैनंदिन कामकाज सुरु होते. मात्र आता लॉकडाऊन शिथील केले जात असल्याने न्यायालयाचेही कामकाज वाढवण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार न्यायालयांची वर्गवारी करण्यात आली असून त्यात रेड झोनमध्ये असलेल्या महापालिकांमध्ये असलेले न्यायालये 'ए' वर्गवारीत असून तेथे फक्त अत्यावश्यक कामकाज होणार आहे. तर इतर क्षेत्रामंधील न्यायालये 'ब' वर्गवारीत असून तेथे ५० टक्के कामकाज सुरु होणार आहे. त्यामुळे नाशिक व मालेगाव येथील न्यायालयांमध्ये लॉकडाऊन काळात जसे कामकाज सुरु होते त्याचप्रमाणे सुरु राहणार असून फक्त कामकाजाची वेळ वाढवली आहे. तर इतर न्यायालयांमध्ये वेळेसोबत कामकाजही वाढवण्यात येणार आहे.'बार'ची सभा वेबिनारद्वारेबार असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा वेबिनारच्या माध्यमातून झाली. त्यात उच्च न्यायालयाने दिलेल्या सुचनांनुसार न्यायालयाचे कामकाज सुरु करण्याबाबत चर्चा झाली. न्यायालयात वकील व पक्षकारांची गर्दी टाळण्यासाठी ई गव्हर्नन्स आणि ई फायलिंग सेंटर सुरू करण्यासाठी जिल्हा न्यायालयातील आय.टी. बार लायब्ररीमध्ये सेंटर सुरू करण्यासाठी मागणी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामार्फत दावे, केसेस, अपिल्स, रिव्हिजन्स दाखल करणे व विविध प्रकरणांमध्ये युक्तिवाद सेंटर मधून करणे शक्य होईल. तसेच वकिलांना ई गव्हर्नन्स आणि ई फायलिंग बाबत माहिती देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष व सदस्य ॲड. जयंत जायभावे व ॲड. अविनाश भिडे, ॲड. श्रीधर माने, ॲड. सुधीर कोतवाल, आदींनी सहभाग घेतला. सभेचे सूत्रसंचालन सचिव ॲड. जालिंदर ताडगे व सहसचिव ॲड. शरद गायधनी यांनी केले तर आभार खजिनदार ॲड. संजय गिते यांनी मानले.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस