शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

सोमठाणमध्ये गोदापात्रातून वाळू चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:38 IST

: जिल्ह्यातील अनधिकृत गौणखनिजाचा उपसा व चोरीच्या विरोधात महसूल प्रशासनाकडून कारवाई केली जात असताना सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथे गोदावरी नदीच्या पात्राजवळच मोठ्या प्रमाणावर बेकादेशीरपणे वाळूचा उपसा केला जात असून, त्याकडे मात्र सोयिस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे.

नाशिक : जिल्ह्यातील अनधिकृत गौणखनिजाचा उपसा व चोरीच्या विरोधात महसूल प्रशासनाकडून कारवाई केली जात असताना सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथे गोदावरी नदीच्या पात्राजवळच मोठ्या प्रमाणावर बेकादेशीरपणे वाळूचा उपसा केला जात असून, त्याकडे मात्र सोयिस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे. या उपशासाठी यंत्राचा वापर करण्याबरोबरच, अवजड वाहनांद्वारे वाळूची वाहतूक केली जात असल्याची छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे.  गेल्या वर्षी व यंदाही जिल्ह्णातील वाळू ठिय्यांचे लिलाव झालेले नाहीत, अशा परिस्थितीत जिल्ह्णातील कोरड्याठाक पडलेल्या नद्यांमधून वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी केली जात आहे. तर परजिल्ह्णातूनही रात्री-अपरात्री वाळूचे ट्रक शहरात दाखल होत आहेत. शासनाचा महसूल बुडवून आणल्या जात असलेल्या वाळूची तस्करी रोखण्यासाठी महसूल खात्याकडून प्रयत्न केले जात असले तरी, त्याला पूर्णपणे आळा बसलेला नाही. उलट वाळू माफियांशी संधान बांधून वाळू चोरीला उत्तेजन दिले जाते की काय अशी शंका घेण्यास वाव असलेले काही पुरावे सोशल माध्यमावर व्हायरल होत आहेत. सिन्नर तालुक्यातील सोमठाण गावाजवळून वाहणाऱ्या गोदावरीच्या पात्रालगत अशाच प्रकारे बेकायदेशीर वाळूचा गेल्या काही महिन्यांपासून वारेमाप उपसा केला जात असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. नदीमधून वाळू उपसा करण्यासाठी यंत्राचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी असताना सोमठाणच्या वाळू ठिय्यांवर यंत्र सामग्रीच बसविण्यात आली असून, जेसीबी व पोकलॅन्डच्या सहाय्याने उपसलेली वाळू मोठ्या अवजड ट्रकमध्ये भरण्याचे काम दिवस-रात्र सुरू आहे. खुलेआम सुरू असलेल्या या प्रकाराचा गंध जागरूक (?) महसूल यंत्रणेला लागू नये याविषयी परिसरातील शेतकºयांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.काही पर्यावरणप्रेमींनी थेट या वाळू उपसा ठिकाणावर जाऊन छायाचित्र काढून ते सोशल माध्यमावर व्हायरल करून महसूल खात्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्याला अद्याप तरी प्रतिसाद मिळालेला नाही.मिळालेल्या माहितीच्या आधारे गोदावरीच्या काठावर एका राजकीय पुढाºयाच्या नातेवाइकाने मत्स्यपालनाची अनुमती घेतली होती व त्यासाठी काही प्रमाणात नदीपात्राला लागून वाळूचा उपसा केला होता. त्यावेळी घेतलेल्या अनुमतीच्या आड आजही दररोज शेकडो ब्रास वाळूचा उपसा केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयsandवाळू