नेऊरगावच्या सरपंचपदी मोनाली सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 06:12 PM2021-02-13T18:12:58+5:302021-02-13T18:15:13+5:30

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील नेऊरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मोनाली रामेश्वर सोनवणे तर उपसरपंचपदी दशरथ रामचंद्र कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Monali Sonawane as Sarpanch of Neurgaon | नेऊरगावच्या सरपंचपदी मोनाली सोनवणे

येवला तालुक्यातील नेऊरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मोनाली सोनवणे तर उपसरपंचपदी दशरथ कदम यांच्या निवड प्रसंगी उपस्थित पुंजाराम कदम, गणेश पेंढारी, संपत कदम व ग्रामस्थ.

googlenewsNext
ठळक मुद्देउपसरपंचपदी दशरथ कदम यांची बिनविरोध निवड

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील नेऊरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मोनाली रामेश्वर सोनवणे तर उपसरपंचपदी दशरथ रामचंद्र कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच, उपसरपंच निवडणुकीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या वेळेत सरपंचपदासाठी मोनाली सोनवणे व उपसरपंचपदासाठी दशरथ कदम यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

त्यांची निवड झाल्याचे जाहीर होताच ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करत नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार केला.
यावेळी पुंजाराम कदम, बाबासाहेब बोराडे, कैलास कदम, भानुदास कदम, शिवाजी आबा कदम, राजू आप्पा, विनोद बोराडे, गणेश पेंढारी, संपत कदम, प्रदीप कदम, श्रावण बोराडे, गोरख कदम, अरुण कदम, मच्छिंद्र बोराडे, रमेश कदम, सुनील कदम, देवीदास कदम, दत्तू कदम, पोपट कदम उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जगताप, तलाठी श्रीमती भगत यांनी काम पाहिले.

नेऊरगाव ग्रामपंचायतीला आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जमाती स्‍त्री राखीव जागा आरक्षित झाल्याने येथील मोनाली सोनवणे या एकमेव शेतमजूर महिलेला सरपंचपदाचा मान मिळाल्याने परिसरामध्ये कौतुक होत आहे.
 

 

Web Title: Monali Sonawane as Sarpanch of Neurgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.