शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
7
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
8
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
9
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
10
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
11
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
12
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
13
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
14
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
15
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
16
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
17
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
18
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
19
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
20
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान

.पालकांसाठी ‘क्षणभर विश्रांती’ क्लबघरकुल परिवार :

By admin | Updated: July 6, 2014 00:10 IST

विशेष मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी संस्थेने घेतला पुढाकार

उपनगर : मानसिक व शारीरिक दृष्टीने अपंगत्व आलेल्या पाल्यांच्या पालकांना त्यांच्या पाल्याच्या विविध समस्या सोडविण्यासाठी व त्यांच्या वेदना हलक्या करण्यासाठी पालकांसाठी घरकुल परिवार संस्थेतर्फे ‘क्षणभर विश्रांती’ या रिक्रीएशन क्लबची स्थापना करण्यात आली.नासर्डी पुलावरील नंदिनी क्लब येथे झालेल्या कार्यक्रमात ‘क्षणभर विश्रांती’ या रिक्रीएशन क्लबचे उद्घाटन ‘येलो’ फेम अभिनेत्री गौरी गाडगीळच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र बापट, विनायक गोविलकर, सिने कलावंत गौरीची आई स्नेहा गाडगीळ, प्रशिक्षक हर्षद इनामदार, रेखा फडके, शोभना कडेपूरकर, मैथली गोखले आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुमारे ५० पालकांनी क्षणभर विश्रांती क्लबमध्ये आपली नावे नोंदवली. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी नंदिनी क्लब येथे रिक्रिएशन क्लबतर्फे पालकांसाठी विविध कार्यक्रम, तसेच चर्चासत्र होणार आहे. उपक्रमामागील संकल्पना डॉ. जयंत ढाके यांनी स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याताई फडके यांनी केले.गौरीने जिंकली सर्वांची मने‘येलो’ फेम अभिनेत्री गौरी गाडगीळची मुलाखत घेणाऱ्या सदानंद जोशी यांनी गौरीला तिच्या क्रीडाविश्व ते सिनेसृष्टीतील यशस्वी प्रवासाबद्दल विचारलेल्या विविध प्रश्नांची तिने हजरजबाबीपणाने उत्तरे दिली. तसेच येलो चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सिने कलावंत उपेंद्र लिमये, ऋषिकेश जोशी, मृणाल कुलकर्णी यांच्या सोबत केलेल्या गमती-जमतीचे किस्से रंगतदारपणे सांगत गौरीने उपस्थितांची मने जिंकली. ‘येलो’ म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर देताना तर गौरीने थेट येलो चित्रपट बघितल्यावरच येलो म्हणजे काय हे तुम्हाला समजेल, असे उत्तर देत चित्रपटाचे रहस्य कायम ठेवले. यावेळी गौरीची आई स्नेहा गाडगीळ व प्रशिक्षक हर्षल इनामदार यांनी गौरीच्या जिद्दीबद्दल आपले मत व्यक्त केले. (वार्ताहर)