.पालकांसाठी ‘क्षणभर विश्रांती’ क्लबघरकुल परिवार :

By Admin | Updated: July 6, 2014 00:10 IST2014-07-05T23:52:57+5:302014-07-06T00:10:43+5:30

विशेष मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी संस्थेने घेतला पुढाकार

'Momentous rest' for parents' clubhouse family: | .पालकांसाठी ‘क्षणभर विश्रांती’ क्लबघरकुल परिवार :

.पालकांसाठी ‘क्षणभर विश्रांती’ क्लबघरकुल परिवार :


उपनगर : मानसिक व शारीरिक दृष्टीने अपंगत्व आलेल्या पाल्यांच्या पालकांना त्यांच्या पाल्याच्या विविध समस्या सोडविण्यासाठी व त्यांच्या वेदना हलक्या करण्यासाठी पालकांसाठी घरकुल परिवार संस्थेतर्फे ‘क्षणभर विश्रांती’ या रिक्रीएशन क्लबची स्थापना करण्यात आली.
नासर्डी पुलावरील नंदिनी क्लब येथे झालेल्या कार्यक्रमात ‘क्षणभर विश्रांती’ या रिक्रीएशन क्लबचे उद्घाटन ‘येलो’ फेम अभिनेत्री गौरी गाडगीळच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र बापट, विनायक गोविलकर, सिने कलावंत गौरीची आई स्नेहा गाडगीळ, प्रशिक्षक हर्षद इनामदार, रेखा फडके, शोभना कडेपूरकर, मैथली गोखले आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुमारे ५० पालकांनी क्षणभर विश्रांती क्लबमध्ये आपली नावे नोंदवली. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी नंदिनी क्लब येथे रिक्रिएशन क्लबतर्फे पालकांसाठी विविध कार्यक्रम, तसेच चर्चासत्र होणार आहे.
उपक्रमामागील संकल्पना डॉ. जयंत ढाके यांनी स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याताई फडके यांनी केले.
गौरीने जिंकली सर्वांची मने
‘येलो’ फेम अभिनेत्री गौरी गाडगीळची मुलाखत घेणाऱ्या सदानंद जोशी यांनी गौरीला तिच्या क्रीडाविश्व ते सिनेसृष्टीतील यशस्वी प्रवासाबद्दल विचारलेल्या विविध प्रश्नांची तिने हजरजबाबीपणाने उत्तरे दिली.
तसेच येलो चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सिने कलावंत उपेंद्र लिमये, ऋषिकेश जोशी, मृणाल कुलकर्णी यांच्या सोबत केलेल्या गमती-जमतीचे किस्से रंगतदारपणे सांगत गौरीने उपस्थितांची मने जिंकली. ‘येलो’ म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर देताना तर गौरीने थेट येलो चित्रपट बघितल्यावरच येलो म्हणजे काय हे तुम्हाला समजेल, असे उत्तर देत चित्रपटाचे रहस्य कायम ठेवले. यावेळी गौरीची आई स्नेहा गाडगीळ व प्रशिक्षक हर्षल इनामदार यांनी गौरीच्या जिद्दीबद्दल आपले मत व्यक्त केले. (वार्ताहर)

Web Title: 'Momentous rest' for parents' clubhouse family:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.