सटाण्यात तरु णीचा घरात घुसून विनयभंग

By Admin | Updated: May 28, 2017 00:13 IST2017-05-28T00:13:23+5:302017-05-28T00:13:39+5:30

सटाणा : शहरातील दत्तनगर परिसरात राहणाऱ्या वीस वर्षीय तरुणीच्या घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी व तिच्या शेजारील गृहस्थांना मारहाण करणाऱ्या फिरोज मुक्तार तांबोळी याला सटाणा पोलिसांनी अटक केली आहे.

The molestation of the youth in the house | सटाण्यात तरु णीचा घरात घुसून विनयभंग

सटाण्यात तरु णीचा घरात घुसून विनयभंग

लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : शहरातील दत्तनगर परिसरात राहणाऱ्या वीस वर्षीय  तरुणीच्या घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी व तिच्या बचावासाठी आलेल्या शेजारील गृहस्थांना मारहाण करणाऱ्या फिरोज मुक्तार तांबोळी याला सटाणा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.  तरु णीच्या भावासोबत झालेल्या किरकोळ वादाची कुरापत काढून तरुणीचा विनयभंग केला; मात्र यावेळी शेजारी राहणाऱ्या गृहस्थांनी त्याला मज्जाव केला असता त्यांनादेखील तांबोळी यानी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.  याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन मगर करीत आहेत.

Web Title: The molestation of the youth in the house