शरणपूर परिसरात महिलेचा विनयभंग
By Admin | Updated: July 10, 2017 17:12 IST2017-07-10T17:12:57+5:302017-07-10T17:12:57+5:30
रात्रीच्या सुमारास एकट्या असलेल्या महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची घटना शरणपूररोड परिसरात घडली़

शरणपूर परिसरात महिलेचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : रात्रीच्या सुमारास एकट्या असलेल्या महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची घटना शरणपूररोड परिसरात शनिवारी (दि़८) घडली़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित राजू वाघमारे (रा. जुने पोलीस आयुक्तालयासमोर, शरणपूररोड) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास संशयित राजू वाघमारे हा एका महिलेच्या घरात घुसला व तिचा विनयभंग केला़ महिलेने विरोध केला असता त्याने महिलेच्या पोटात गुद्दे मारून पळ काढला़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.