अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By Admin | Updated: July 3, 2017 01:58 IST2017-07-03T01:51:53+5:302017-07-03T01:58:49+5:30
नाशिक : अल्पवयीन मुलीचा युवकाने विनयभंग केल्याची घटना घडली़

अल्पवयीन मुलीचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भारतनगरमधील अल्पवयीन मुलीचा ओळखीतील युवकाने विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (दि़२९) दुपारच्या सुमारास घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारतनगर परिसरातील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी दुपारच्या सुमारास घरात एकटी होती़ त्यावेळी तिच्याशी ओळख असलेल्या तीस वर्षीय अली (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) नावाच्या युवकाने घरात घुसून विनयभंग केला़ तसेच शिवीगाळ तसेच दमदाटी करून पळून गेला़या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलिसांनी संशयित अलीविरोधात विनयभंग तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़