महिलेस फोन करून विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:51 IST2017-09-29T23:50:31+5:302017-09-29T23:51:10+5:30
नाशिक : मूळची चाळीसगाव, तर सद्यस्थितीत रविवार कारंजा परिसरात राहणाºया महिलेच्या मोबाइलवर फोन करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करीत विनयभंग केल्याची घटना गुरु वारी (दि़२८) सकाळच्या सुमारास घडली़

महिलेस फोन करून विनयभंग
नाशिक : मूळची चाळीसगाव, तर सद्यस्थितीत रविवार कारंजा परिसरात राहणाºया महिलेच्या मोबाइलवर फोन करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करीत विनयभंग केल्याची घटना गुरु वारी (दि़२८) सकाळच्या सुमारास घडली़ रविवार कारंजा परिसरातील ३२ वर्षीय महिलेच्या मोबाइलवर सकाळच्या सुमारास ७७४१९०१८१३ या मोबाइलवरून फोन आला़ समोरील व्यक्तीने महेश पाटील असे नाव सांगत मला तुझ्याशीच बोलायचे आहे, तुझा पती केव्हा घराबाहेर असतो, अशी विचारणा केली़ यावर महिलेने पुन्हा फोन न करण्याची तंबी दिली असता संशयिताने अश्लील भाषेचा वापर करून विनयभंग केला़ याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून संशयिता विरोधात गुन्हा दाखल केला आहे़