शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

दरोड्याच्या सूत्रधारासह टोळीवर मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 01:25 IST

उंटवाडी रोडवरील मधुरा टॉवरमधील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांसह टोळीचा मुख्य सूत्रधार व दरोडेखोरांना मदत करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने अखेर ‘मोक्का’अन्वये कारवाई केली आहे.

नाशिक : उंटवाडी रोडवरील मधुरा टॉवरमधील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांसह टोळीचा मुख्य सूत्रधार व दरोडेखोरांना मदत करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने अखेर ‘मोक्का’अन्वये कारवाई केली आहे. यामध्ये १५ संशयित आरोपींचा समावेश आहे. या टोळीने संघटितपणे कट रचून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कार्यालयात दरोडा टाकला. यावेळी प्रतिकार करणाºया कर्मचाºयास गोळ्या झाडून ठार मारण्यात आल्याचेही तपासात उघडकीस आले आहे.मुथूट फायनान्सच्या कार्यालयात १४ जून २०१९ रोजी सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. मात्र कार्यालयातील धाडसी कर्मचारी साजू सॅम्युअल याने केलेल्या विरोधामुळे आणि दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे दरोडेखोरांचा सोने लुटीचा प्रयत्न पूर्णपणे फसला. यावेळी दरोडेखोरांनी साजूवर केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. शहर पोलिसांनी तपास करून गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश राज्यातून संशयित जितेंद्रसिंग विजय बहादूर सिंग राजपूत (३४, गुजरात), परमेंदर उर्फ गौरवसिंग राजेंद्रसिंह (३१, रा. सुरत, ), आकाशसिंग विजय बहादूर सिंग राजपुत (३०, रा. उत्तर प्रदेश) यांना अटक केली. त्यांच्याकडील चौकशीतून दरोड्याचा कट रचणारा मास्टरमाइंड सुबोधसिंह ईश्वरीप्रसाद सिंह (३५, रा. बिहार) हा असल्याचे उघड झाले. त्यानुसार संशयित दरोडेखोर व त्यांना मदत करणाºयांवर मोक्कानुसार कारवाई केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त समीर शेख हे करीत आहेत.सुबोधसिंह सध्या बिहार येथील कारागृहात शिक्षा भोगत आहे. तसेच त्यांचे अन्य आठ संशयितांचीही नावे पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. दरोडेखोरांनी पूर्वनियोजित कट रचून संघटितपणे हा दरोडा टाकल्याचे उघडकीस आले. यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी संशयित आरोपींविरोधात महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी