शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चंदनचोरांच्या टोळीवर ‘मोक्का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:54 IST

संघटित टोळी तयार करून शहरातील सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून सैन्य व पोलीस दलाच्या आस्थापनांमध्ये रात्रीच्या सुमारास घुसखोरी करून चंदनवृक्ष कापण्याचा सपाटा लावणाºया शेणीत, पाथर्डी गावातील चौघांना पोलिसांनी सातपूरच्या गुन्ह्यात यापूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी या चौघा चंदनचोरांची गुन्हेगारी प्रवृत्ती तपासून चंदनचोरीच्या दरोड्याच्या गुन्ह्यात ‘मोक्का’नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देचौघे गजाआड : शासकीय आस्थापनांमध्ये घुसखोरी

नाशिक : संघटित टोळी तयार करून शहरातील सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून सैन्य व पोलीस दलाच्या आस्थापनांमध्ये रात्रीच्या सुमारास घुसखोरी करून चंदनवृक्ष कापण्याचा सपाटा लावणाºया शेणीत, पाथर्डी गावातील चौघांना पोलिसांनी सातपूरच्या गुन्ह्यात यापूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी या चौघा चंदनचोरांची गुन्हेगारी प्रवृत्ती तपासून चंदनचोरीच्या दरोड्याच्या गुन्ह्यात ‘मोक्का’नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे शहरातील संवेदनशील सैन्य दलाच्या आस्थापनांसह शासकीय निवासस्थानांमधील घुसखोरीला चाप लागण्यास मदत होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला जात आहे.सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत औद्योगिक वसाहतीमध्ये सहा चंदनचोरांच्या टोळीने एका कारखान्यातील सुरक्षारक्षकाला जिवे ठार मारण्याचा धाक दाखवून मारहाण करत गंभीर जखमी केले होते. तसेच त्याच्यासमोर कारखान्यातील चंदनवृक्ष कापून लंपास केल्याची धक्कादायक घटना ५ आॅगस्ट २०१९ साली घडली होती. या गुन्ह्यात तपासी पथकांनी आपल्या कौशल्याचा वापर करत या गुन्ह्यात टोळीचा म्होरक्या लक्ष्मण तात्या पवार (२२), संजय माणिक जाधव (२५ दोघे रा.पाथर्डीगाव), शिवाजी उत्तम जाधव (२५), उत्तम नारायण जाधव (५५, दोघे रा. नानेगावरोड, पळसे) यांना अटक केली आहे. त्यांचे दोन साथीदार रामा विलास कोळी (४०, रा. पाथर्डी), तात्या तुकाराम पवार (५० शेणीतगाव) हे दोघे अद्याप फरार असून, पोलीस त्यांच्या मागावर आहेत. चौघा चोरट्यांकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, चंदनवृक्षाचा बुंधा जप्त केला आहे. चोरी केलेल्या चंदनाच्या वृक्षांच्या खोडामधील गाभा काढून ही टोळी चढ्या भावाने विक्री करत असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे....म्हणून ‘मोक्का’चा दणकानियोजनबद्ध कट रचून संघटितपणे वारंवार ही टोळी गुन्हे घडवून आणत होती. संशयितांविरुद्ध यापूर्वीही स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी शस्त्रांचा वापर करून केलेले गुन्हे की ज्यामध्ये तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद आहे. त्यापैकी काही गुन्हे न्यायप्रविष्ट असल्याचे पूर्वइतिहासावरून पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. नांगरे-पाटील यांनी गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून शहरात सक्रिय असलेली चंदनचोरांची टोळी फोडून काढण्यासाठी मोक्का कायद्यानुसार कारवाईचे आदेश दिले आहे.येथील कापले चंदनवृक्षदेवळाली कॅम्प, उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील सैन्य दलाच्या विविध अस्थापनांसह गंगापूर, मुंबईनाका या भागातील शासकीय निवासस्थाने आस्थापना आणि सातपूर औद्योगिक वसाहतीतील चंदनवृक्ष या टोळीने कापल्याचे तपासात पुढे आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी