सामाईक बांध नांगरल्यावरून महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:17 IST2021-09-24T04:17:36+5:302021-09-24T04:17:36+5:30
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील ब्राह्मणगाव शिवारातील फिर्यादी व तिचे पती त्यांच्या शेतात घरासमोर लिंबाच्या झाडाच्या फांद्या तोडत असताना ...

सामाईक बांध नांगरल्यावरून महिलेचा विनयभंग
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील ब्राह्मणगाव शिवारातील फिर्यादी व तिचे पती त्यांच्या शेतात घरासमोर लिंबाच्या झाडाच्या फांद्या तोडत असताना राजेंद्र रामचंद्र सोनवणे, भूषण राजेंद्र सोनवणे, नंदकिशोर राजेंद्र सोनवणे, कल्पना राजेंद्र सोनवणे यांनी संगनमत करून फिर्यादीच्या शेतात अनधिकृत प्रवेश केला. यावेळी फिर्यादी व फिर्यादीच्या पतीस, तुमच्या मुलाने सामाईक बांध का नांगरला असे बोलून फिर्यादीच्या पतीला धरून विहिरीकडे ओढून नेले असताना फिर्यादी महिला त्यांच्या पाठीमागे गेली. यावेळी फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यावेळी फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ५० वर्षीय महिलेशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष अनुमोलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एच. बी. कदम करीत आहेत.