मोगल यांना सर्वपक्षीयांची श्रद्धांजली

By Admin | Updated: July 14, 2014 00:32 IST2014-07-13T22:40:06+5:302014-07-14T00:32:01+5:30

मोगल यांना सर्वपक्षीयांची श्रद्धांजली

Mogal's tribute to all the parties | मोगल यांना सर्वपक्षीयांची श्रद्धांजली

मोगल यांना सर्वपक्षीयांची श्रद्धांजली

कसबे सुकेणे : दिवंगत माजी आमदार मालोजीराव मोगल यांना कसबे व मौजे सुकेणेसह परिसरातील ओणे, थेरगाव, दात्याणे, जिव्हाळे, भाऊसाहेबनगर, नांदुर्डी येथे विविध सामाजिक व सर्वपक्षीयांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
जिल्हा महानुभाव समिती
नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने वार्षिक सभेचे कामकाज तहकूब करून मोगल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी वामनराव आवारे होते. यावेळी प. पू. मनोहरशास्त्री सुकेणेकर, प. पू. अर्जुनराज सुकेणेकर, प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर, प. पू. बाळकृष्णराज सुकेणेकर, पोपटराव गायकवाड, सुधाकर भंडारे यांनी मोगल यांच्या आठवणींना उजाळा देत जिल्हा महानुभाव समितीच्या कार्यात मालोजीराव मोगल यांचे नेहमी पाठबळ लाभले असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प. पू. गोपीराजशास्त्री सुकेणेकर यांनी केले.
प्रवासी संघटना
कसबे सुकेणे परिसर प्रवासी संघटनेच्या वतीनेही कै. मालोजीराव मोगल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मोगल यांच्या निधनाने निफाड तालुक्याचा आधारवड हरपला असून, निर्मळ व स्वच्छ राजकारण करून काकांनी जनमानसात स्थान मिळविले असल्याचे यावेळी प्रवासी संघटनेचे कॉ. प्रभाकर कातकाडे, सचिन टिपाले, अ‍ॅड. एम. बोरा, यांनी सांगितले.
के.आर.टी. विद्यालय
मविप्रच्या कै. रावसाहेब थोरात विद्यालयातही दिवंगत मोगल यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. दात्याणे येथील जनता विद्यालयातही मालोजीराव मोगल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्याध्यापक एल. एस. हिरे यांनी विद्यार्थ्यांना मोगल यांच्या कार्याची माहिती दिली.
कसबे सुकेणे येथील शिवसेना शहर शाखेच्या वतीनेही मोगल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शोकसभेच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष विश्वास भंडारे होते. यावेळी निफाडचा विकासाचा पाया रचण्यात मालोजीकाकांचा सिंहाचा वाटा होता, असे यावेळी विश्वास
भंडारे व सुहास भंडारे यांनी
सांगितले.
कसबे सुकेणे व मौजे सुकेणे येथील विविध मित्रमंडळ, सामाजिक संस्थांनी मोगल यांना श्रद्धांजली वाहिली. (वार्ताहर)

Web Title: Mogal's tribute to all the parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.