पालिकेच्या सभागृहात मोदींची प्रतिमा

By Admin | Updated: May 27, 2014 00:03 IST2014-05-26T18:34:11+5:302014-05-27T00:03:48+5:30

नाशिक : देशाचे नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा लवकरच महापालिकेच्या सभागृहात लावण्यात येणार आहे. त्यासाठी आता प्रतीक्षा आहे, ती त्यांच्या अधिकृत प्रतिमेची!

Modi's image in the Municipal Hall of the Municipal Corporation | पालिकेच्या सभागृहात मोदींची प्रतिमा

पालिकेच्या सभागृहात मोदींची प्रतिमा

नाशिक : देशाचे नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा लवकरच महापालिकेच्या सभागृहात लावण्यात येणार आहे. त्यासाठी आता प्रतीक्षा आहे, ती त्यांच्या अधिकृत प्रतिमेची!
देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची प्रतिमा शासकीय कार्यालयात लावण्याचा प्रघात आहे. महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेत तर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिमा असतात. तथापि, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या प्रतिमा लावणे बंधनकार आहे. त्यामुळे महापालिकेतदेखील त्यांची प्रतिमा विराजमान करण्यात येणार आहे. येत्या महासभेत ही प्रतिमा सभागृहात लावलेली असेल, असे उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात मात्र पालिकेला अशी घाई करता येणार नाही. केंद्र शासनाकडून मान्य केलेल्या पद्धतीचीच प्रतिमा लावता येत असल्याने पालिकेतील उत्साही मंडळींना काहीसा आवर घालावा लागणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेत उपमहापौरांच्या आणि भाजपा गटनेत्यांच्या दालनातही अटलबिहारी वाजपेयी आणि (स्व.) प्रमोद महाजन यांच्या बरोबरच आता नरेंद्र मोदी यांची प्रतिमा लावण्यात येणार आहे.

Web Title: Modi's image in the Municipal Hall of the Municipal Corporation