मोदी यांची आता उद्या होणार सभा
By Admin | Updated: October 6, 2014 00:10 IST2014-10-05T22:51:09+5:302014-10-06T00:10:24+5:30
पावसाचे पाणी : तपोवनात मोठ्या प्रमाणात झाले नुकसान

मोदी यांची आता उद्या होणार सभा
नाशिक : भाजपाच्या दृष्टीने लक्षवेधी ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठीच्या तयारीवर पावसाने पाणी फेरले. रविवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने सर्व तयारीवर अक्षरश: पाणी फिरले. त्यामुळे मोदी यांची सभा स्थगित करण्यात आली. हीच सभा आता येत्या मंगळवारी (दि. ७) होणार आहे. भाजपा आणि शिवसेना यंदा स्वतंत्र निवडणूक लढवित असून, त्यामुळे भाजपासाठी ही सभा अधिक महत्त्वाची आहे. भाजपा जिल्'ात १५ पैकी १४ जागांवर निवडणूक लढवित आहे. याशिवाय नाशिक जिल्'ालगत असलेल्या धुळे आणि नंदुरबार जिल्'ाला या सभेचा लाभ होईल, असे भाजपाचे म्हणणे होते. त्यामुळे तपोवनात सुमारे चाळीस एकर जागेत होणाऱ्या मोदी यांच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली होती. याठिकाणी दोन व्यासपीठ तसेच महत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. तसेच फ्लड लाईटसाठी मनोरेही उभारण्यात आले होते; परंतु चार वाजता शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच पंचवटी भागात पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सभास्थळी मोठे नुकसान झाले. फ्लड लाईटचे मनोरे कोसळले. व्यासपीठाचे नुकसान झाले. सभास्थळी लावण्यात आलेले झेंडे, बॅनरही कोसळले. तपोवनातील शेतजमिनीत ही सभा होत असल्याने याठिकाणी चिखल झाला तसेच तळे साचले. या प्रकारानंतर सदरची सभा तातडीने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ही सभा मंगळवारी सायंकाळी ७ वाजता तपोवन येथेच होणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश संघटनमंत्री डॉ. राजेंद्र फडके यांनी दिली.