मोदी सरकारने केला भ्रमनिरास
By Admin | Updated: July 12, 2014 00:26 IST2014-07-11T22:39:09+5:302014-07-12T00:26:54+5:30
मोदी सरकारने केला भ्रमनिरास

मोदी सरकारने केला भ्रमनिरास
कळवण : आमदार ए. टी. पवार यांनी कुटुंबातील कलह प्रमुख या नात्याने मिटवावे, असे भावनिक आवाहन करून दुष्काळाशी सामना करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी कळवण येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केले.
अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे, राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शोभा मगर, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार डॉ. भारती पवार, रवींद्र देवरे, बाजार समिती सभापती धनंजय पवार, पंचायत समिती सभापती मधुकर जाधव होते. मेळाव्यात भुजबळ म्हणाले ‘अच्छे दिन आनेवाले है’चा भूलभुलय्या करून खोटी आश्वासने देत केंद्रात सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. कांद्याचे निर्यातमूल्य वाढले की शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ शरद पवार यांना भेटत. लगेचच निर्यातबंदी उठली जायची. तरीही जनतेने नाकारले याचे शल्य बोचत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. आगामी निवडणुका लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले.
कादवाचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, शोभा मगर, जिल्हा परिषद सदस्या भारती पवार, तालुकाध्यक्ष नारायण हिरे, जनार्दन भोये, चिंतामण गावित, केदा बहिरम यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याला माजी सभापती कौतिक पगार, शरद गुंजाळ, उपसभापती हिरामण पगार, शंकर मराठे आदि उपस्थित होते.
दिंडोरीतील मेळाव्यातही टीका
ङ्क्त नरेंद्र मोदी यांनी नुसतीच स्वप्न दाखवत जनतेला भुरळ घातली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जनतेने उघडपणे अपेक्षेने भाजपाला निवडून दिले.
मात्र मोदी सरकारने महागाई वाढवत कांदा निर्यात मूल्य वाढवत कांदा बटाटा जीवनावश्यक वस्तूत टाकून शेतकरी व्यापारी अशा घटकांचा विश्वासघात केल्याची टीका करत केंद्रात ‘अब कि बार महंगी सरकार’ आल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिंडोरीतील मेळाव्यात सांगितले आहे.
लखमापूर फाटा येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुजबळ बोलत होते. अध्यक्षस्थानी कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे होते. पुढे बोलताना भुजबळ यांनी जिल्ह्याच्या विकासाचे दावे करताना केलेल्या कामांचा पाढाच वाचून दाखवला. जनतेच्या जिव्हाळ््याच्या प्रश्नी वेळप्रसंगी शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, माजी आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा बँकेचे संचालक गणपत पाटील यांनी, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, बाळासाहेब नाठे, जिल्हा परिषद गटनेते प्रकाश वडजे, विश्वासराव देशमुख, भिका पाटील आदिंची भाषणे झाली. यावेळी कृउबा सभापती दत्तात्रय पाटील, माजी आमदार रामदास चारोस्कर, वसंत वाघ उपस्थित होते. (वार्ताहर)