शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पावसाच्या मध्यम सरींचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 19:27 IST

शहरातील अशोकस्तंभ, पंचवटी, गंगापूररोड, शरणपुररोड, सीबीएस, मेनरोड, जुने नाशिक आदि भागात पावसाने संध्याकाळी हजेरी लावली.

ठळक मुद्दे गंगापूर धरण समुहात जोरदार पाऊस

नाशिक : शहरात बुधवारी (दि.५) सकाळी तसेच संध्याकाळी पावसाच्या सरींचा दमदार वर्षाव झाला. टप्प्याटप्प्याने विविध उपनगरांमध्ये सरी बरसल्या. यामुळे रस्ते ओलेचिंब झाले होते. सकाळी शहराच्या उपनगरांमध्ये तर संध्याकाळी शहराच्या मध्यवर्ती भागात पावसाने दमदार हजेरी लावली. दिवसभरात ४.७ मिमी इतका पाऊस नोंदविला गेला. शहरात या हंगामात अद्याप केवळ ४७३.८ मिमी इतका पाऊस झाल्याची माहिती पेठरोडवरील हवामान निरिक्षण केंद्राने दिली आहे.जुलै महिन्याच्या ३१ तारखेला १९.२ मिमी इतका पाऊस आठ तासांत पडला होता. तत्पुर्वी ९ जुलै रोजी ५.३ मिमी इतका पाऊस पडला होता. त्यानंतर बुधवारी ४.७ मिमी पावसाची नोंद झाली. एकूणच जुलै महिना शहरासाठी कोरडाठाक गेला. आॅगस्ट उजाडल्यानंतर प्रथमच बुधवारी शहरासह उपनगरांमध्ये अधुनमधुन का होईना कमी-अधिक प्रमाणात पावसाच्या सरी बरसल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला. शहरातील अशोकस्तंभ, पंचवटी, गंगापूररोड, शरणपुररोड, सीबीएस, मेनरोड, जुने नाशिक आदि भागात पावसाने संध्याकाळी हजेरी लावली. पावसाच्या मध्यम स्वरूपातील सरींचा वर्षाव पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ झाल्यामुळे रस्त्यांवरील उंचसखल भागात पाणी साचले होते. शहरात दिवसभर ढगाळ हवामान कायम होते. सरींचा वर्षाव झाल्यामुळे वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण काहीसे कमी झाले. गुरूवारी (दि.६) हवामान खात्याकडून उत्तर महाराष्टÑात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.गंगापूर धरण समुहात जोरदार पाऊसगंगापूर धरण समुहात बुधवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला. गंगापूर धरण परिसरात ३७, गौतमी-३४, अंबोली-५२, त्र्यंबके श्वर-६१, काश्यपी-११ मिमी इतका पाऊस पडला. गंगापूर धरणाचा जलसाठा ५२ टक्के इतका झाला आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकweatherहवामानRainपाऊस