दारव्हा बनणार मॉडेल शहर
By Admin | Updated: July 11, 2015 00:14 IST2015-07-11T00:14:55+5:302015-07-11T00:14:55+5:30
शहराचा नियोजनबद्ध विकास व्हावा व दारव्हा हे मॉडेल शहर म्हणून विकसित व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहे,

दारव्हा बनणार मॉडेल शहर
नाशिक : आयुर्वेद महाविद्यालयासमोरील गणेशवाडी भाजीमार्केटमधील ४६८ ओट्यांसाठी महापालिकेने राबविलेल्या लिलाव प्रक्रियेला विक्रेत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लिलावात बोली बोलण्यासाठी महापालिकेत सकाळपासूनच विक्रेत्यांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत लिलावाची प्रक्रिया सुरू होती.
गोदाघाटावरील भाजीबाजार हटल्यानंतर महापालिकेने लगेचच गणेशवाडी भाजीमार्केटमधील लिलाव प्रक्रिया घोषित केली होती. त्यानुसार महापालिकेच्या रेकॉर्ड रुममध्ये ४६८ ओट्यांसाठी लिलाव प्रक्रियेला सकाळी ११ वाजेपासून सुरुवात करण्यात आली.
उप आयुक्त रोहिदास बहिरम आणि पंचवटीचे विभागीय अधिकारी ए. पी. वाघ यांनी लिलावाची सूत्रे सांभाळली. लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम ठेवण्यात आली होती. त्यानुसार अनामत रक्कम भरण्यासाठी सकाळपासूनच विक्रेत्यांनी गर्दी केली होती. त्यानंतर भाजीपाल्यासाठी ३७९ ओटे, कांदा-बटाटासाठी ३७ ओटे, फळांसाठी ३७ ओटे आणि फळे, बेदाण्यासाठी १५ ओटे याकरिता लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. ए विंगमध्ये ४८ पैकी ३२ गाळे विक्रेत्यांना देण्यात आले होते. लिलावासाठी सरकारी दर १३७५ रुपये निश्चित करण्यात आला होता; मात्र १७२० रुपयांपर्यंत बोली गेल्याचे दिसून आले.
एका व्यक्तीला एकच ओटा घेता येणार असल्याने रेकॉर्डरूम बाहेर विक्रेत्यांची मोठी गर्दी जमली होती. सदर ओट्यांसाठी मासिक भाडे आकारले जाणार असून तीन वर्षांसाठी ओटे देण्यात येणार आहेत. दरवर्षी भाड्यामध्ये १० टक्के भाडेवाढ केली जाणार असल्याचे उप आयुक्त रोहिदास बहिरम यांनी सांगितले.